फलटण (फलटण टुडे ): अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे जिल्हाध्यक्षपदी वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथील प्रा. नितीन नाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा. नितीन नाळे हे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले कनि. महाविद्यालय सासवड (ता. फलटण) येथे गेली २२ वर्षे भूगोल व सहकार या विषयांचे अध्यापन करीत आहेत.
साहित्य क्षेत्रात आजअखेर त्यांनी विविध विषयांवर १००९
व्याख्याने दिली आहेत. अनेक काव्य संमेलने व साहित्य संमेलनामध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे.
प्रा.नितीन नाळे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर एक राष्ट्रीय व आठ राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
त्यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके, महेंद्र सूर्यवंशी-बेडके, पदाधिकारी, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.