सातारा, दि. 12: राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) दि. 13 मे 2022 ते 20 मे 2022 सकाळी 11 ते दुपारी 3 (दि.14 मे, 15 मे व 16 मे 2022 ची सार्वजनिक सुट्टी वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) दि. 23 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) दि. 25 मे 2022 रोजी दुपारी 3 वा. पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि. 25 मे 2022 रोजी दुपारी 3 वा. नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 5 जून 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वा. पर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) दि.6 जून 2022 रोजी. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 9 जून 2022 पर्यंत.