गावांतर्गत मुलभूत नागरी सुविधांसाठी २५१५ मधून फलटण तालुक्यात आणखी १० कोटी रुपये उपलब्ध : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा)

    फलटण दि. ९ : महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाने सन २०२१ – २२ या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी लेखाशीर्ष २५१५ मधून फलटण – कोरेगांव विधानसभा मतदार संघांतर्गत विविध गावातील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी सुचविलेल्या ९३ कामांसाठी ९ कोटी ९० लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दिली आहे.

     महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली आ.दिपकराव चव्हाण साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), फलटण पंचायत समिती माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केंद्र व राज्य शासन, सातारा जिल्हा परिषद सार्वजनिक व व्यक्तिगत लाभाच्या विविध योजना फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात प्रभावीपणे राबवून कृषी, शिक्षण, आरोग्य, महसूल, वीज वगैरे खात्यांतर्गत विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यात सतत उज्वल यश प्राप्त केले आहे.

  २५१५ लेखा शीर्षकांतर्गत सुमारे १० कोटी रुपये नव्याने उपलब्ध झाले आहेत. त्याचा विनियोग खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे.

  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या सूचनेनुसार २५१५ मधून निधी उपलब्ध झालेली गावे व त्यासमोर मंजूर निधी खालीलप्रमाणे आहे

 विडणी येथे चिंचेचा मळा ते आसू रोड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लाख रुपये, विडणी येथे २४ फाटा कॅनॉल ते आसू रोड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लाख रुपये, विडणी येथे २६ फाटा मोडकाई १० बिघे बाबीर मार्ग आसू रोड रस्ता करणे १५ लाख रुपये, विडणी येथे पंढरपूर रोड ते अशोक काका पवार वस्ती, जाधव वस्ती रस्ता करणे १५ लाख रुपये, विडणी येथे पंढरपूर रोड ते इंगळे वस्ती रस्ता करणे १५ लाख रुपये, विडणी येथे पंढरपूर रोड ते सर्जेराव नाळे वस्ती रस्ता करणे १५ लाख रुपये, धुळदेव लक्ष्मी हॉटेल ते खडकहिरा ओढा बंदिस्त गटर्स करणे ८ लाख रुपये, धुळदेव भिवरकर वस्ती रस्ता करणे २० लाख रुपये, पिंपरद गावठाण अंतर्गत रस्ता करणे १५ लाख रुपये, सांगवी आसू रोड ते गुंजवटे वस्ती रस्ता करणे १५ लाख रुपये, सोमंथळी शिर्के वस्ती ते हरीभाऊ पोकळे वस्ती रस्ता करणे १५ लाख रुपये, सरडे धायगुडे वस्ती ते सरडे बंगला रस्ता करणे १५ लाख रुपये, सोनगांव बंगला ते सोनगांव रस्ता करणे १५ लाख रुपये, सोमंथळी पन्हाळेवस्ती ते सोनगाव रस्ता करणे १५ लाख रुपये, तरडगाव ते स्मशानभूमी साकव बांधणे १० लाख रुपये, तरडगाव ते चव्हाणवाडी रस्ता करणे १० लाख रुपये, आरडगाव ते बाळुमामा मंदिरापर्यंत रस्ता करणे १० लाख रुपये, चांभारवाडी ते स्मशानभूमी रस्ता करणे ५ लाख रुपये, सातारा लोणंद रस्ता ते तांबवे जोड रस्ता करणे १० लाख रुपये, काळज ते संजय गाढवे वस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, कोरेगाव ते लेंडीच्या ओढ्यावर साकव बांधणे १० लाख रुपये, कोरेगाव ते गोवेकर वस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, परहर खु ! ते मदनेवस्ती रस्ता करणे २५ लाख रुपये, पाडेगाव ते येळेकाळेवस्ती रस्ता करणे ५ लाख रुपये, पाडेगाव ते रायकरवस्ती रस्ता करणे २० लाख रुपये, रावडी बु ! येथे आसू पाडेगाव रस्ता ते बोबडे वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, मुरुम येथे आसू पाडेगाव रस्ता ते सुतारकी रस्ता करणे ६ लाख रुपये, खामगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर वॉल कंपाऊंड बांधणे ८ लाख रुपये, मिरेवाडी ते स्मशानभूमी रस्ता करणे ५ लाख रुपये, कुसुर येथे अंतर्गत रस्ता करणे 
५ लाख रुपये, पाडेगाव हुडेवस्ती रस्ता करणे ३ लाख रुपये, तडवळे गावठाण अंतर्गत रस्ता करणे ८ लाख रुपये, साखरवाडी येथे माडकरमळा, बोडरेवस्ती, गायकवाड भगतवस्ती अंतर्गत रस्ते करणे ८ लाख रुपये, साखरवाडी येथे दत्तमंदिर ते शेडगेवस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, होळ येथे आसू पाडेगाव रस्ता ते मेटकरीवस्ती रस्ता करणे १८ लाख रुपये, जिंती साखरवाडी रस्ता ते डंकिनवस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, होळ ते डंकिनवस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, निंभोरे अंतर्गत रस्ता करणे ८ लाख रुपये, खुंटे एस.टी.स्टॅन्ड ते हनुमान मंदिर मागून खंडोबानगर रस्ता करणे ५ लाख रुपये, ७ सर्कल होळ डंकिनवस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, जिंती फलटण चारीच्या पश्चिम बाजूने जयदिप काटे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख रुपये, सस्तेवाडी शेती हायस्कूल ठोंबरे वस्ती खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख रुपये, अलगुडेवाडी दत्तु साधु सोडमिसे ते कुदळेवस्ती रस्ता खडीकरण करणे ८ लाख रुपये, साखरवाडी समीर भोसले रस्ता करणे ३ लाख रुपये, जिंती राजाळकी रस्ता करणे ५ लाख रुपये, कांबळेश्वर भिवाई मंदिर, सुरेश भिसे वस्ती ते अँड.नेवसे बापू वस्ती रस्ता खडीकरण करणे २० लाख रुपये, कांबळेश्वर सोमंथळी रस्ता ते भंडलकरवस्ती मार्गे नेवसेवस्ती रस्ता करणे २० लाख रुपये, चौधरवाडी येथे १८ फाटा यशवंतराव कदम वस्ती ते फलटण सर्कल रस्ता करणे १५ लाख रुपये, खुंटे जिती रस्ता ते १८ फाटा ते येळेकाळेवस्ती रस्ता करणे २५ लाख रुपये, फडतरवाडी रेल्वेलाईन ते निबाळकरवस्ती रस्ता करणे १८ लाख रुपये,  सस्तेवाडी शेती शाळा ते अँड.विश्वनाथ टाळकुटे वस्ती रस्ता करणे १५ लाख रुपये, 

जिंती येथे बिरोबामंदीर परिसर सुधारणा करणे १० लाख रुपये, गुणवरे चव्हाणवस्ती ते प्रजिमा ७ रस्ता करणे ग्रामा ११० – १८ लाख रुपये, मुंजवडी राम ओटा ते उखळी ओढा रस्ता करणे ८ लाख रुपये, जाधववाडी तामखडा ते वाघमोडेवस्ती रस्ता करणे १२ लाख रुपये, ढवळेवाडी ते फलटण आसू रस्ता करणे ग्रामा १२८ – २० लाख रुपये, निंबळक ते २९ फाटा रस्ता करणे १५ लाख रुपये, गोखळी येथे फलटण आसू रोड ते गंगथडेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, पवारवाडी ते तामखडा ते मुळीकवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, ढवळेवाडी पंचबिघा ते राम ओटा रस्ता करणे ग्रामा १४१ – १५ लाख रुपये, आसू कुरबाबी रस्ता ते खारतोडे रस्ता करणे ८ लाख रुपये, 

आसू बेघरवस्ती ते बोडरेवस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, पवारवाडी येथे बटई पुल ते गावडेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, निंबळक कापसे वस्ती अंतर्गत रस्ता करणे १५ लाख रुपये, पवारवाडी येथे तावरेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये,

गुणवरे घुलेवस्ती ते हणमंतवाडी रस्ता करणे (तामखडा चौक ते हणमंतवाडी वडाचीवाडी) ग्रामा १२२ – १८ लाख रुपये, मठाचीवाडी ते शेलारमळा ते भोसलेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, मठाचीवाडी येथे वाघ घर ते कदम वस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, जि.प.प्रा.शाळा जाधववाडी तामखडा ते आप्पा ठेंगील घरापर्यंत रस्ता करणे ८ लाख रुपये, गोखळी ग्रामपंचायत कार्यालय बाजार मैदान पेव्हींग बसविणे ८ लाख रुपये, 
सासवड भुरकरवाडी रस्ता ते ओढाचामळा रस्ता डांबरीकरण करणे १० लाख रुपये, सासवड अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे १० लाख रुपये, वडजल ढेंबरेमळा रस्ता करणे ८ लाख रुपये, 

टाकुबाईचीवाडी ग्रामपंचायत जवळ सभामंडप बांधणे ८ लाख रुपये, मुळीकवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ८ लाख रुपये, बिबी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे १० लाख रुपये, वडगाव अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ८ लाख रुपये, वाघोशी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ८ लाख रुपये, कोऱ्हाळे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ८ लाख रुपये,
आदर्की बु ! भैरवनाथ मंदिराशेजारी परिसर पेव्हर ब्लॉक बसविणे ८ लाख रुपये, घाडगेवाडी येथे घाडगेवस्ती रस्ता करणे ८ लाख रुपये, मिरगाव अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे ८ लाख रुपये, हिंगणगाव मातंगवस्ती ते खंडोबामंदिर पर्यंत रस्ता करणे ५ लाख रुपये, आदर्की हिंगणगाव रस्ता ते पिराचे व वाघाचे वावर रस्ता करणे ५ लाख रुपये, आदर्की बु ! ते माळेवाडा सावतानगर ते कॅनॉलपर्यंत रस्ता करणे ८ लाख रुपये, हिंगणगाव धनगरवाडा शाळा ते बिरोबामंदिर रस्ता करणे ५ लाख रुपये, आदर्की बु ! ते मंडईचे माळ रस्ता करणे ५ लाख रुपये, बरड बागेवाडी ते वाघमोडेवस्ती ते गावडेवस्ती मुंजवडी रस्ता करणे १८ लाख रुपये, मलवडी गावठाण अंतर्गत रस्ते तयार करणे ८ लाख रुपये, आदर्की खु ! गावठाण मोठी विहिर ते महादेव बाबुराव निबाळकर यांचे घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे ७ लाख रुपये, कोळकी शिंदेवस्ती येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ८ लाख रुपये, राजूरी कॅनॉल ते सांगळेवस्ती रस्ता करणे ७ लाख रुपये, राजुरी कॅनॉल ते माळवेवस्ती रस्ता करणे ७ लाख रुपये.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!