वंजारवाडी मध्ये गाई चे डोहाळे जेवन समारंभ संपन्न

गाईचे डोहाळे जेवण  कार्यक्रमात कीर्तन करताना शरद महाराज व दुसऱ्या छायाचित्रात पूजन  करताना महिला

बारामती:
तालुक्यातील वंजारवाडी मध्ये गंगा व सरस्वती या दोन गाईच्या प्रेमा पोटी शेतकरी ज्ञानदेव खाडे व सौ  फुलाबाई खाडे यांनी गाईचे डोहाळे जेवण समारंभ व कीर्तनाचे आयोजन केले होते.
रविवार ०८ मे रोजी खाडेनगर येथे सदर कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते या वेळी गाईचे औषण,पूजन व सर्व गावकऱ्यांना भोजन त्यानंतर ‘कामधेनू व शेतकऱ्यांची आई गोमाता’ विषयावर ह.भ.प शरद महाराज घोळवे यांचे कीर्तन आयोजित केले होते .
गाई बदल प्रेम व गाई ही शेतकऱ्यांची आई असल्याने गाई पाळा व उत्कृष्ट शेती करा हा संदेश देण्यासाठी या पूर्वी खाडे कुटूंबियांनी गाई दान व म्हशी दान करण्यासाठी कार्यक्रम घेतले होते आप्पासो टेकवडे,रमेश जगताप,सुरेश चौधर,रामदास लोखंडे, शरद मालुसरे,सुखदेव झारगड,संतोष चौधर,अंकुश जगताप,शहाजी ओमासे, रामदास गंगावणे,शिवाजी मालुसरे आदी उपस्तीत होते आधुनिक व तंत्रज्ञान  युगात 
गाई ही शेतकऱ्यांची खरी कैवारी आहे तिच्या बदल कृतन्यता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रम चे आयोजन केल्याचे ज्ञानदेव व सौ फुलाबाई खाडे यांनी सांगितले 
स्वागत अजिनाथ खाडे यांनी केले तर आभार चंद्रकांत डोईफोडे यांनी मानले
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!