बारामती:
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळवाडी या गावातील चंद्रशेखर दत्तात्रय लडकत या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 या परीक्षेतून जलसंपदा विभागामध्ये राजपत्रित सहायक अभियंता पदी निवड झाली.चंद्रशेखरने इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण हे गावातीलच वसतिगृह विद्यालय का-हाटी येथून पूर्ण केले.आणि नंतर स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी बारामती तालुक्यातील माळेगाव या कॉलेजमधून संपादन केली.लहानपणापासूनच अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून चंद्रशेखर अभ्यासाचा पाया भक्कम केला.बारामती मधील सुप्रसिद्ध लडकत सायन्स अकॅडमी चे संचालक नामदेव लडकत व गणेश लडकत यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत.