अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, माजलगाव, नंदुरबार, जालना, धुळे भागातून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी कामगार आपल्या लहान लहान मुलाबाळांसह येत असतात.जवळपास सहा-सात महिने आपल्या घरापासून दूर असतात ऊसतोडणी कामगारांना आपला ऊस तोडणी हंगाम संपल्यानंतर आपल्या घराकडे जाण्याचे वेध लागतात. आपल्या मुलांबरोबर संसार उपयोगी साहित्यासह आपलं बिर्हाड घेऊन जात असतात.त्याना घरी सुरक्षित पोहचवण्यासाठी ऊस तोड टोळी मालक विकास घोरपडे (आसू ता.फलटण) यांनी सर्व कामगारांना आसू ते नंदुरबार असा सुरक्षित प्रवास बारामती एसटी आगाराचे आगार प्रमुख श्री अमोल गोंजारी साहेब यांचे सहकार्याने घडवून आणला.या उपक्रमाबद्दल विकास घोरपडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बारामती एसटी आगाराचा इतर एसटी आगारानी आदर्श घेऊन असे कौतुकास्पद सामाजिक उपक्रम राबविल्यास ऊस तोडणी कामगारांना एसटी च्या प्रवाहात आणता येईल व ऊस तोडणी कामगार हक्काचे प्रवाशी करून एसटी च्या उत्पन्नात वाढ होईल. ऊस तोडणी कामगारांचा एसटीने सुरक्षित प्रवास घडवून आणल्याचा आनंद कामगारांना चेहऱ्यावर लपवता आला नाही.विकास घोरपडे यांच्या उपक्रमाचा इतर ऊसतोळी मालकांनी आर्दश घेतल्यास ऊस तोडणी कामगारांना आपलसं करता येईल.ऊस तोडणी संपल्यानंतर गावाकडे परतीच्या प्रवासाला अनेकदा अपघात घडले आहेत.राब राब राबून गावाकडे परतीचा प्रवास सुध्दा धोकादायक जीव मुठीत धरून करावं लागतो कष्टकरी वर्गाला आसू येथील विकास घोरपडे यांनी बारामती येथील एस.टी.आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला तीन एसटी बसेस प्रासंगिक करार करून या कष्टकऱ्यांचा प्रवास एसटी ने सुखकर सुरक्षित घडवून आणला .याभागात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला याचे सर्वत्र कौतुक होत आहे.