डॉ.विजयकुमार काळे यांची आयुष भारत महाराष्ट्र राज्य हिप्नोथेरेपी अध्यक्ष पदी निवड

डॉ विजयकुमार काळे 

बारामती:
 आयुष भारत महाराष्ट्र राज्य हिप्नोथेरेपी अध्यक्ष पदी  डॉ.विजयकुमार काळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली. ही निवड डॉ.जलील शेख, डॉ.फैयाज शेख, डॉ.विश्वास वाघमारे, डॉ.भोसले, डॉ.काशिनाथ माळी, व राष्ट्रीय नियोजन समितीचे सर्व अध्यक्ष व आदी मान्यवर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे, आयुष भारत संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत संघटना आहे. 
 आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे आदी काम आयुष भारत तर्फे केले जाते 

 डॉक्टर व रुग्ण यांचे शासकीय दरबारी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे निवडीनंतर  डॉ.विजयकुमार काळे यांनी सांगितले
 
————————————-
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!