आयटीआय सातारा येथे 21 एप्रिल रोजी राष्ट्रीय भरती मेळाव्याचे आयोजन

 सातारा ‍दि 18 :

  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा येथे  21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वा राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास सातारा तसेच पुणे जिल्हयातील नामांकित कंपन्या  महिंद्रा आणि महिंद्रा, कमिन्स इंडिया,  रिएटर इंडिया, गरवारे, कुपर इंडिया, उत्कर्ष ट्रान्समिशन, सायक्लो ट्रान्समिशन व इतर  कंपन्या   उपस्थित राहणार आहेत. पाचवी ते बारावी पास, आयटीआय उत्तीर्ण  तसेच पदवी ,पदविका धारक  उमेदवारांनी स्वखर्चाने या मेळाव्यास उपस्थित राहावे.

 

     कंपनीचे अधिकारी त्यांच्या  कंपनीची माहिती अटी,शर्ती ,सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांच्या    प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्रमाणपत्रे तपासून त्याच दिवशी भरती केली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारानी आवश्यक कागदपत्रासह आयटीआय सातारा येथे  दि २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी 9.30  वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य सचिन धुमाळ, उपप्राचार्य  संजय मांगलेकर, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मिलिंद उपाध्ये यांनी केले आहे. अधिक माहिती साठी बीटीआरआय द्वारा आयटीआय  सातारा येथे संपर्क साधावा.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!