बारामती दि.16: फलटण टुडे
बारामती एमआयडीसी मधील व्हेंनचर स्टील च्या वतीने कंपनीच्या संचालिका कै. सौ.छाया बाबासाहेब शेंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब शेंडे,माणिकभाई सराफ रक्तपेढीचे सचिव डॉ अशोक दोशी, वैदकीय अधिकारी डॉ बारवकर,कंपनीचे विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्तीत होते.
कै छाया शेंडे यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले होते त्यांच्या स्मृती पित्यारर्थ गेल्या वर्षी महिला शासकीय रुग्णालय येथील नर्सिंग स्कुल मधील कोविड सेंटरला उच्च प्रतीचे बेड देण्यात आले होते
या वर्षी ( शनिवार 16 एप्रिल) कंपनीच्या आवारातच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये १०२ बाटल्या रक्तसंकलीत करण्यात आले.
कै. छाया शेंडे यांच्या समरणार्थ विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांची जयंती साजरी करून सामाजिक भान राखले जात असल्याची माहिती बाबासाहेब शेंडे यांनी दिली
या प्रसंगी रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.