नवोदय निवड चाचणी परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी

 
 सातारा दि. 18 : फलटण टुडे
नवोदय निवड चाचणी परीक्षा शनिवार दि. 30 एप्रिल 2022 रोजी सातारा जिल्ह्यातील नियोजीत 11 तालुक्यातील 30 परीक्षा केंद्रावर होत आहे. नवोदय प्रवेश परीक्षा 2022 वर्ग सहावीच्या प्रवेशाचे प्रवेशपत्र नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापक यांनी प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करावयाचे आहे. प्रवेशपत्राशिवाय परीक्ष हॉलमध्ये परीक्षा देण्याची परवानगी  दिली जाणार नाही. वेळेत प्रवेशपत्र डाऊनलोड करुन पालकांनी, आपला पाल्य इयत्ता पाचवीमध्ये ज्या शाळेत शिकत असेल त्या शाळेतील मुख्याध्यापकांची त्यावर स्वाक्षरी घ्यावी व त्याची एक झेरॉक्स प्रत काढून आपल्याकडे ठेवावे. मुळ प्रवेश पत्र परीक्षा केंद्रावर जमा करुन घेतले जाईल. प्रवेशपत्राशिवाय परीक्षेला बसता येणार नाही असे विद्यालयाचे उपप्राचार्य राजुल शमकुवर यांनी कळविले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!