फलटण दि. १६ : फलटण टुडे
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधिंनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लेखाशिर्ष २५१५ अंतर्गत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात आ. दिपकराव चव्हाण यांनी सुचविलेल्या ५७ कामांसाठी ४ कोटी ९८ लाख रुपये उपलब्ध करुन दिल्याची माहिती श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ. दिपकराव चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक व व्यक्तिगत लाभाच्या विविध योजना फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात प्रभावीपणे राबवून कृषी, शिक्षण, आरोग्य, महसूल, वीज वगैरे खात्यांतर्गत विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यात सतत उज्वल यश प्राप्त केले आहे, त्याचप्रमाणे २५१५ लेखा शिर्षकांतर्गत सुमारे ५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.
२५१५ लेखा शिर्षकांतर्गत मंजूर झालेली कामे व त्यासमोर त्यासाठी मंजूर निधी खालील प्रमाणे आहे.
फलटण – पंढरपूर रस्ता ते नेवसेवस्ती या कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यासाठी ८ लाख रुपये, तिरकवाडी ते फलटण दहिवडी रस्ता १० लाख रुपये, वर्षा ढाबा ते मोरे वस्ती या झिरपवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यासाठी ८ लाख रुपये, सोनवडी खु| ग्रामपंचायत कार्यालय ते दत्तनगर रस्ता खडीकरण डांबरीकरण ८ लाख रुपये, सोनवडी बु| सावतामाळी मंदिर ते सोनवलकर वस्ती रस्ता ७ लाख, सासकल पाटी ते मुळीकवस्ती रस्ता खडीकरण १० लाख रुपये, कोळकी ग्रामपंचायत कार्यालय ते चोरमले घर रस्ता डांबरीकरण १० लाख रुपये, दुधेबावी ते वडले वांजळे रस्ता करणे व काँक्रीट पाईप टाकणे १५ लाख रुपये, राजुरी येथे कॅनॉल ते सांगळेवस्ती रस्ता १० लाख रुपये, मिरढे ते पोकळेवाडा रस्ता २० लाख रुपये, वडले पाटील वस्ती रस्ता १० लाख रुपये, फलटण शिंगणापूर रस्ता ते आंदरुड प्रा.शाळा ते शिंगणापूर रस्ता १८ लाख रुपये, दुधेबावी ते सावतामाळी रस्ता १० लाख रुपये, कृष्णा अपार्टमेंट महादेवनगर जाधववाडी ते कोळकी रस्ता १८ लाख रुपये, कोळकी रावरामोशी पूल ते खडकहिरा ओढा बंदिस्त गटर १५ लाख रुपये, जावली ते पोकळेवस्ती रस्ता १५ लाख रुपये, जावली अंतर्गत रस्ते डांबरीकरण ८ लाख रुपये, जाधववाडी फलटण-गिरवी रस्ता ते गोरे घर रस्ता करणे १० लाख रुपये, न्यू वर्षा ढाबा ते सासकल रस्ता १० लाख रुपये, गिरवी वरची आळी ते स्मशानभूमी रस्ता ७ लाख रुपये, गोरेवस्ती जाधवनगर येथे बाणगंगा नदी साकव पूल काँक्रीट भिंती बांधणे १० लाख रुपये, जाधववाडी अन्नपूर्णा मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे ८ लाख रुपये, जाधववाडी सजाई गार्डन ते गोरे नर्सरी रस्ता ५ लाख रुपये, फरांदवाडी वॉर्ड क्रमांक ३, माऊलीनगर,तांबमाळ अंतर्गत रस्ता १० लाख रुपये, वाठार निंबाळकर अंतर्गत वाठार फाटा, वडजल फाटा ते भोंगळे वस्ती रस्ता ५ लाख रुपये, वेळोशी गावठाण पूल ते नाना रोमण वस्ती रस्ता ८ लाख रुपये, उपळवे शेखर लंभाते घर ते मयूर कर्णे पोल्ट्री रस्ता ७ लाख रुपये, सावंतवाडी नेवसेवस्ती ते भंडलकर वस्ती रस्ता ७ लाख रुपये, तरडफ मारुती मंदिर ते आरोग्य केंद्र रस्ता ५ लाख रुपये, तरडफ स्मशानभूमी ते श्रीमंत मदने घर रस्ता १० लाख रुपये, शेरेचीवाडी ते ढवळ अंतर्गत रस्ता १५ लाख रुपये, पिराचीवाडी स्वागत कमान ते दुर्गादेवी चौक रस्ता ८ लाख रुपये, पिराचीवाडी ग्रामपंचायत कार्यालय ते नाईक समाज सभामंडप ते पिराचे मंदिर रस्ता ५ लाख रुपये, खडकी बापू कोकरे घर ते मंदिरापर्यंत रस्ता ८ लाख रुपये, उपळवे हणमंत लंभाते घर ते जगन्नाथ लंभाते घर रस्ता ७ लाख रुपये, वाठार निंबाळकर तरटेवस्ती ते दिपाकाकी निंबाळकर वस्ती रस्ता १० लाख रुपये, ठाकुरकी तावडी फाटा ते शेलार वस्ती रस्ता १५ लाख रुपये, ठाकुरकी ज्योतिबा नगर ते बोडरे वस्ती रस्ता १० लाख रुपये, फरांदवाडी बामनकीचा ओढा ते दूध संघ ते निंबाळकर वस्ती ते वडजल रस्ता ८ लाख रुपये, मठाचीवाडी शेरेवस्ती अंतर्गत रस्ता ७ लाख रुपये, तरडगाव आंबेमळा रस्ता खडीकरण, डांबरीकरण १२ लाख रुपये, मौजे पिंपोडे बु| शिवाजीनगर ते संजय लेंभे घराशेजारी रस्ता काँक्रीटीकरण ५ लाख रुपये, मौजे पिंपोडे बु| अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ५ लाख रुपये, मौजे वाघोली अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख रुपये, अनपटवाडी सुरेश शिंदे घर ते वसंत कदम घर रस्ता ५ लाख रुपये, दहिगाव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख रुपये, राऊतवाडी ग्रामपंचायत कार्यालय वरचा मजला बांधणे १० लाख रुपये, तळीये मारुती पिसाळ घर ते पाण्याच्या टाकी पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख रुपये, वाठार स्टेशन वाग्देव महाराज पालखी मार्ग रस्ता १० लाख रुपये, भावेनगर अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख रुपये, घीगेवाडी स्मशानभूमी रस्ता ५ लाख रुपये, सोळशी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख रुपये, नायगाव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख रुपये, रणदुल्लाबाद अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख रुपये, मोरबेंद अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख रुपये, जाधववाडी बेलदारवस्ती ते रामभाऊ जाधव घराकडे जाणारा रस्ता ४ लाख रुपये, फडतरवाडी (दाणेवाडी) येथे समाजमंदिर दुरुस्ती ५ लाख रुपये.