क्रीडा प्रशिक्षणातून राष्ट्रीय खेळाडू तयार होतील : श्रीमंत संजीवराजे

 शिबिराचे उद्घाटन प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, फलटण तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य ननवरे ए. वाय., क्रीडा समितीचे सदस्य महादेव माने, संजय फडतरे, शिरीष वेलणकर व मान्यवर.

फलटण दि. १६  : 
फलटणमध्ये खोखो, हॉकी या खेळाची फार मोठी परंपरा आहे. जगन्नाथ धुमाळ सरांनी त्यावेळी हॉकीमध्ये बरेचसे राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार केले. त्यांनी खऱ्या अर्थाने हॉकीची परंपरा चालू ठेवलली व ती वाढत वाढत पुढे गेली. परंतू ती परंपरा थोडी मागे पडत चालली आहे. आगामी काळामध्ये खो – खो, कबड्डी, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाईल त्यामध्ये फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. फलटणची खेळाची परंपरा अशीच सुरु ठेवण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी व खेळाडूंनी चांगला सराव व खेळामध्ये सातत्य ठेवले तर पूर्वीप्रमाणेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळ खेळणारे खेळाडू तयार होतील, असे मत महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य ननवरे ए. वाय., क्रीडा समितीचे सदस्य व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, संजय फडतरे, शिरीष वेलणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विनय नेरकर या हॉकी खेळाडू चा शिवाजी विद्यापीठ हॉकी संघाच्या कर्णधार पदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर दि. १५ एप्रिल ते दि. ३० मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये हॉकी, फुटबॉल, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो – खो, कबड्डी, कुस्ती व आर्चरी या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. घडसोली मैदान येथे हॉकी, फुटबॉल, खो – खो, हॉलीबॉल या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अथलेटिक्स, कुस्ती व कबड्डी, मुधोजी क्लब येथे बास्केटबॉल या खेळाचे तसेच श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी येथे आर्चरी या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


यावेळी हॉकी साठी महेश काळे, सचिन धुमाळ, कु. धनश्री क्षीरसागर, फुटबॉल साठी अमित काळे, मोनील शिंदे, बास्केटबॉल साठी बाबर, रोहन निकम व संकेत कुंभार, व्हॉलीबॉल साठी डॉ. स्वप्नील पाटील, शिंदे वी.जी, शिंदे डि.एन, सौरभ चतुरे, अथलेटिक्स साठी राज जाधव, प्रा. तायप्पा शेंडगे, कबड्डी साठी तुषार मोहिते, सुळ ए. बी., खो – खो साठी अविनाश गंगतीरे, सावंत, पवार, मुलाणी, कुस्ती साठी कु. अनिता गव्हाणे, आर्चरी साठी सुरज ढेंबरे हे शिबिरार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

सदर शिबिरामध्ये खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाडूंचा आहार संबंधित खेळाचे कौशल्य याविषयी तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभाणार आहे. सदर शिबिरामध्ये जवळजवळ ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व शिबिरार्थी खेळाडूंना दररोज अल्पोपहार दिला जाणार आहे.


या उन्हाळी शिबीर उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा समितीचे सदस्य तुषार मोहिते यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ व या कार्यक्रमाचे आभार क्रीडा समितीचे सदस्य प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!