बारामती (फलटण टुडे) :
बारामती रोलिन स्केटिंग क्लब च्या वतीने आयोजित पुणे ते बारामती अंतर स्केटिंग करण्याची रिले स्पर्धा मंगळवार (ता.12 एप्रिल )आयोजित करण्यात आली होती. या मध्ये ज्ञानसागर गुरुकुल सावळ या शाळेतील इयत्ता 6 वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रेया गोरे हिने कमी वेळात हे अंतर पार केले.
या बदल विद्या प्रतिष्ठान चे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी जलतरणपटू सुभाष बर्गे
संस्थेचे प्रमुख सागर आटोळे , उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे ,दिपक सांगळे, पल्लवी सांगळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते,स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे आदी मान्यवर उपस्तीत होते.
—-–————-