दुचाकीवरून विचार पोहचविणारे मोहन कांबळे यांचा सन्मान
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दुचाकी वरून पोहचविणारे मोहन कांबळे यांचा सत्कार करताना युगेंद्र पवार व इतर
बारामती:
महात्मा ज्योतीबा फुले यांचे विचार कालही, आजही व भविष्यात सुद्धा क्रांती घडविणारे असून पुढील पिढीला प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठान चे खजिनदार युगेंद्र पवार यांनी केले.
जळोची येथील क्रांतिसूर्य युवक प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.
या प्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीरंग जमदाडे,सचिव धनंजय जमदाडे
राष्ट्रवादी ओबीसी सेल चे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन शेंडे,प्रताप पागळे,आदित्य हिंगणे,आदित्य जमदाडे,निखिल होले, आकाश जमदाडे,तेजस जमदाडे,गणेश जमदाडे,गणेश पागळे ,सिकंदर शेख,प्रणव जमदाडे,किरण जमदाडे,बन्सी सातकर व श्रीनाथ म्हसकोबा ट्रस्ट,संत सावता माळी तरुण मंडळ चे सदस्य व मान्यवर उपस्तीत होते.
विद्यार्थ्यां साठी शैक्षणिक उपक्रम राबवित असल्याबद्दल प्रतिष्ठान च्या उपक्रमाचे कौतुक युगेंद्र पवार यांनी केले.
बारामती पासून सर्व राज्यात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक गावात पोहचवण्यासाठी ‘दुचाकी परिक्रमा’ करणारे जळोची चे मोहन कांबळे यांचा सन्मान युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रीरंग जमदाडे यांनी प्रतिष्ठान च्या कार्याची माहिती दिली तर आभार किरण फरांदे यांनी मानले
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले