बारामती मध्ये पुस्तक बँकेस प्रतिसाद


बारामती: 

बारामती नगर परिषद व जय जवान आजी माजी सैनिक संघटना बारामती यांचे संयुक्त विद्यमाने पुस्तक बँक या अभिनव उपक्रमाचे आयोजन दिनांक 9 व 10 एप्रिल रोजी करणेत आले होते या उपक्रमास नागरिकांकडून विशेषतः विद्यार्थी वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला .
बारामती नगरपरिषद चे  मुख्याधिकारी महेश रोकडे  व सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास नगर परिषद चे सुनील धुमाळ ,संतोष तोडकर, सैनिक संघटनेचे सदस्य सदस्य भारत मोरे, दिलीप चौधरी, बापू भापकर, शिवनिंगा माळी, राहुल भोईटे, रविंद्र लडकत, प्रकाश चौधरी, पोपट निकम, गणेश घाडगे, विलास कांबळे, किरण शिपटे, सयाजी जगदाळे, प्रकाश चौधर, दिपक पवार  यांनी विशेष सहकार्य केले 
ज्यामध्ये  सुस्थितीत असणारी जुनी शालेय पुस्तके यांच पूनर्वपर करण्यायोग्य पुस्तके लोकांनी जमा केली.साधारण 250 पुसकांच संच जमा झाले व 85 पुस्तक संच विद्यार्थी घेऊन गेले.सदर उपक्रम शहरात 4 ठिकाणी राबवन्यात आला. गरजू विद्यार्थी व पालकांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!