फलटण दि . ११ (फलटण टुडे ):
थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या जंयती निमित्त मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज , फलटण मध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे तपासणीस अधिकारी दिलीप राजगुडा सर यांनी महात्मा जोतिबा फुले यांनी समतेवर आधारित समाजरचना हे सूत्र मानून जाती व्यवस्थेमुळे पोखरलेल्या समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. अज्ञानाला दूर सारण्यासाठी शिक्षणाचा मार्ग उजागर करत त्यांनी बहुजन आणि स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. असे मत व्यक्त केले .
तसेच यावेळी प्राचार्य गंगावणे सर यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवरणारे महात्मा जोतीराव फुले हे आपल्या सर्वांचे आदर्श असून त्यांनी स्त्री शिक्षणाचे चालू केलेले महान कार्य आपण ते पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे .असे मत व्यक्त केले .
यावेळी मुधोजी हायस्कूल फलटण,उपप्राचार्य फडतरे सर व ए वाय ननवरे सर,पर्यवेक्षक श्री.गोडसे सर व काळे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिवादन केले यावेळी प्रास्ताविक व आभार सौ. बुचडे मॅडम यांनी केले