सातारा, दि.9: 11 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती व 14 एप्रिल 2022 रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती याचे औचित्य साधुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये सामाजिक समता सप्ताहानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने सर्व अर्जदार, विद्यार्थी, पालक, महाविदयालयांना जाती पडताळणी कार्यपध्दतीबाबत माहिती होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व संबधित लिपिक यांची कार्यशाळा सोमवार,दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स, सातारा या महाविदयालयातील कर्मवीर सभागृहामध्ये आयोजित केलेली आहे.
जिल्हयातील सर्व महाविदयालयांचे प्राचार्य तसेच संबधित लिपिक यांनी या कार्यशाळेस न चुकता उपस्थित रहावे, असे आवाहन स्वाती इथापे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.