फलटण :
फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय समिती सदस्यपदी फलटण शहरातील माता भिमाई नगर मंगळवार पेठ येथील व वाखरी शाळेचे मुख्याध्यापक भारत अहिवळे सर यांची निवड झाल्याबद्दलचे पत्र सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह नुकतेच दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशान्वये प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सचिन सूर्यवंशी बेडके यांचे मार्गदर्शनाखाली काम करणारे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे अशी ख्याती असणारे भारत अहिवळे सर यांच्या निवडीमुळे मंगळवार पेठ येथे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. माजी नगरसेविका कालकथित किसाबाई माधव अहिवळे यांचे ते सुपुत्र आहेत.भारत अहिवळे यांच्या निवडीनंतर फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी बापूराव गावडे,सदस्य पदी भारत माधव अहिवळे(रा.फलटण),सौ.अवंतिका विक्रमसिंह जाधव (रा.हणमंतवाडी), दिलीप सर्जेराव अडसूळ (रा.माळवाडी), विकास राजाराम नाळे(रा.मठाचीवाडी), सदाशिव बापूराव जगदाळे (रा.सगुणामाता नगर फलटण), प्रतापसिंह सुभाषराव निंबाळकर (रा.विद्यानगर फलटण), दत्तात्रय कांतीलाल गुंजवटे (रा.सोमंथळी), ज्ञानेश्वर रमेश पवार (रा.वाघोशी), अर्जुन कोंडीबा रुपनवर(रा.कोळकी) आदींची निवड करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे फलटण तहसीलदार समीर यादव आदींनी या निवडी बद्दल अभिनंदन केले.