कॅनडा येथे उच्चशिक्षणासाठी घेण्यात येणार्‍या IELTS परिक्षेत राज अहिवळे यांच उत्तुंग यश.

राज संजय अहिवळे

फलटण :
नुकत्याच कॅनडा येथे उच्च शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात अालेल्या IELTS परिक्षेत मंगळवार पेठ फलटण येथील राज संजय अाहिवळे यांनी घवघवीत यश मिळवले .राज यांनी National Institut & Event Management (NIEM) मध्ये BBA हि पदवी घेतली असुन, त्यांना उच्च शिक्षणासाठी डाॅ.बाबासाहेब अांबेडकरांना अभिप्रेत अासलेल्या मार्गाने परदेशात जायचे होते.कष्ट ,परिश्रम व जिद्द या चिकाटीच्या जोरावर तसेच मंगळवार पेठेतील अनेकांच्या मार्गदर्शनाने राज यांचे प्रयत्न यशस्वी झाले.
डाॅ.बाबासाहेब अांबेडकर हे तरुणांचे आयकॉन अाहेत. त्यांच्या मुळेच अाजचे तरुण भारतातच नव्हे, तर परदेशात उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करु लागलेत. तसेच ते स्वप्न पुर्ण करु लागले अाहेत. मंगळवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते हरिश काकडे. सुधीर अहिवळे , विकास काकडे ,मा.नगरसेवक सचिन अहिवळे ,मा.नगरसेवक सनी अहिवळे व मंगळवार पेठेतील सर्वच स्तरातून राज संजय अहिवळे यांना विविध मान्यवरां कडून शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!