मुधोजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उदघाटन मौजे काळज याठिकाणी झाले..सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मदन पाडवी(कार्यक्रम अधिकारी रा.से.योजना)केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुधोजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पी.एच. कदम हे होते.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल कांबळे व प्रिया जाधव या विद्यार्थ्यांनी केले. तसेच या कार्यक्रमास काळज या गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक,पोलिस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची शपथ सुद्धा घेतली गेली.
त्याचबरोबर कार्यक्रमाचे आभार प्रा.अक्षय अहिवळे यांनी केले.