फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक जल दिनाच्या निमित्ताने व्हिडीओ मेकिंग स्पर्धा उत्साहात संपन्न.

व्हिडीओ मेकिंग स्पर्धेची विजेती स्पर्धक सानिया शेख हिला सन्मानित करताना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मनिष कासार, महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू व इतर

फलटण :

फलटण एज्यूकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयामध्ये जागतिक जलदिन साजरा  करण्यात आला  होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचा सुयोग्य वापर तसेच यावर्षीच्या जलदीनाच्या ‘ भूजल – अदृश्य, दृश्य बनविणे’ या विषयाअंतर्गत व्हिडीयो मेकींग स्पर्धां व पाणी हेच जिवन या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन तसेच बांधकामविषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन‌ करण्यात आले होते.सदर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.  या स्पर्धेमध्ये  सानिया शेख हिने प्रथम क्रमांक, दिक्षा गायकवाड हिने द्वितीय तर वृषभ शिंदे याने तृतीय क्रमांक  पटकावला. बांधकाम विषयक कार्यशाळेस फलटण परिसरातल्या कंत्राटदारांनी  आवर्जून उपस्थिती लावली होती. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचें श्री. मनिष कासार यांनी  कार्यशाळेस मार्गदर्शन केले. बांधकाम क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक पद्धतीमध्ये काळानुरूप बद्दल करायला हवा असे ते उपस्थितांना सांगत होते, तसेच पुढे बोलत असताना त्यांनी बांधकाम क्षेत्रातील नवीन साहित्य व कंस्ट्रक्शन साईटवरती घेतल्या जाणाऱ्या विविध साहित्य-चाचन्यांची उपस्थितांना ओळख करुन दिली. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम वर्ष विभागप्रमुख श्री. शांताराम काळेल यांनीं महाविद्यालय व महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख सौ. धनश्री भोईटे यांनी केले, सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत गोरड यांनी केले, तांत्रिक धुरा श्री. कुणाल चव्हाण यांनी सांभाळली तर सौ. निलम ईंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!