श्रीसमर्थ सातपुते कडून वासोटा जंगल ट्रेक पूर्ण

वासोटा जंगल ट्रेक पूर्ण करताना श्रीसमर्थ सातपुते

बारामती: 
बारामती येथील चार वर्षाच्या श्रीसमर्थ संतोष सातपुते ने आकरा किलोमीटर चे   वासोटा जंगल ट्रेक  चढून जाताना दोन तास व उतरताना 1 तास 10 मिनिटात पूर्ण केला म्हणजे 11 किलोमीटर चे अंतर  चढणे व उतरणे केवळ 3 तास व 10 मिनिटात पूर्ण केले
एम एस फिटनेस क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बालक, युवक ,युवतींना गड किल्ले यांची माहिती होणे साठी व प्लास्टिक मुक्त गड किल्ले करण्यासाठी दरवर्षी ट्रेक चे आयोजन केले जाते 
 रविवार दि 20 मार्च रोजी बारामती शहर व तालुक्यातील युवक युवती साठी वासोटा जंगल ट्रेक चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये श्रीसमर्थ (वय वर्ष ४) हा एकमेव बालक सहभागी झाला होता.न थकता न थांबता व ट्रेक पूर्ण करताना एकदाही पाणी न पिता एका दमात श्री समर्थ याने वासोटा ट्रेक पूर्ण केला आहे .या पूर्वी विविध धावण्याच्या स्पर्धेत सुद्धा त्याने सहभाग घेऊन विजेतेपद मिळवले आहे.
या वेळी शैलेश गोंडे व संतोष सातपुते यांनी मार्गदर्शन केले.
 
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!