बारामती :
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनवीन तंत्रज्ञानशी अवगत करण्यासाठी एज्युनेट फौंडेशन शी सामंजस्य करार केला आहे. यामुळेच संस्थेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता ७ ते १० विच्या विद्यार्थ्याना आता आयबीएम, रेड हॅट, मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या आयटी कंपन्यांचे १०००० पेक्षा जास्त ऑनलाईन कोर्सेस मोफत उपलब्ध झाले आहेत.
विद्यार्थ्यांचा या ऑनलाईन कोर्सेस ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात आयबीएम आणि एज्युनेट फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी देशस्तरीय १४ दिवसाचे ऑनलाईन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात संस्थेतील शाळांमध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना क्रिप्टोकरंन्सी, ब्लॉकचेन, वैयक्तिक कौशल्य, क्रिटिकल थिंकिंग, सायबर सिक्युरिटी, कॉग्निटिव्ह स्किल्स, डेटा सायन्स, क्लाऊड आणि आयओटी डिझाइन थिंकिंग इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले गेले व या विषयांचे कोर्सेस आणि असाइन्मेंट्स त्यांच्याकडून करवून घेण्यात आले.
या शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या शाळांत शिकणाऱ्या २८ विद्यार्थ्यांना आयबीएम आणि एज्युनेट फौंडेशनने शिबिराचे विजेते म्हणून घोषित केले आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.
विद्या प्रतिष्ठानचे शाळानिहाय विद्यार्थी पुढीलप्रमाणे नांदेड सिटी पब्लिक स्कूलचे भावेशसिंह पवार, प्राची पाटील, करण आवटी, अभिज्ञा राव, आणि मयुरेश वणवे, विनोदकुमार गुजर बालविकास मंदिरचे युगंधर शिंदे, रितिका शाह, आणि जान्हवी राऊत, इंग्लिश मिडीयम स्कूलचे हितार्थ पटेल आणि श्वेता पानसरे, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचे श्रावणी मोरे, विभावरी चौधर, सुखदा जगताप, राधिका भापकर, आणि श्रीस्वती बावळे, इंग्लिश मिडीयम स्कूल भिगवणचे श्रीष्टी सिंग आणि समर्थ पिसे, सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलचे अद्विका भापकर आणि वेदान्तिका धुमाळ, डॉ सायरस पुनावाला स्कूलचा वेदांत जाधव, मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूल चे सान्वी अग्रवाल, आदित्य गुप्ता, तनय गुप्ता, अंशुमान श्रीजाई, आणि रुद्रप्रताप बांदल, सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचे अंकिता वाबळे आणि वैष्णवी खोमणे, मराठी मिडीयम स्कूलची गार्गी करचे.
हे ऑनलाईन शिबीर यशस्वी होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी होण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि कोऑर्डिनेटर्स नि मोलाची कामगिरी बजाविली अशी माहिती सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त सुनेत्राताई पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी अॅड. नीलिमाताई गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शाह, किरण दादा गुजर, मंदार सिकची आणि मॅनेजमेंट कॉऊन्सिलचे सर्व सदस्य, रजिस्ट्रार श्रीश कंबोज, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील इतर नागरिकांकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.