फलटण दि. 22 :
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण आयोजित श्री सद्गुरू प्रतिष्ठान फलटण, श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने 27 वे विभागीय मराठी साहित्य संमेलन महाराजा मंगल कार्यालय फलटण या ठिकाणी दि. 21 व 22 मार्च 2022 संपन्न झाले.या साहित्य संमेलनामध्ये संमेलनाच्या दुसऱ्या . दिवशी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सासवडचे प्राध्यापक श्री नितीन महादेव नाळे यांनी अत्यंत प्रभावीपणे सातारी कवी संमेलनामध्ये पर्यावरणीय फटका ही वातावरण बदलावर असणारी सुंदर रचना सादर केली तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फलटण च्या प्राध्यापिका सौ रुपाली सस्ते मॅडम यांनी माणसाला व्यसन असाव या उत्कृष्ट कवितेची रचना सादर केली. साहित्य संमेलनामध्ये मा .श्री भारत सासणे नियोजित अध्यक्ष 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर माननीय श्री सुधीर गाडगीळ सुप्रसिद्ध निवेदक व साहित्यिक पुणे प्राध्यापक श्री मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे माननीय श्री प्रकाश पायगुडे प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे माननीय सौ सुनिता राजे पवार कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे माननीय श्री रवींद्र बेडकिहाळ सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन माननीय डॉक्टर श्री पुरुषोत्तम काळे संपादक महाराष्ट्र* *साहित्य परिषद पुणे तसेच स्वागत अध्यक्ष माननीय श्री दिलीप सिंह भोसले संस्थापक अध्यक्ष श्री सद्गुरू व महाराज उद्योग समूह फलटण आणि माननीय डॉक्टर श्री सचिन सूर्यवंशी बेडके साहेब सचिव श्रीराम* *एज्युकेशन सोसायटी फलटण आणि सातारा व महाराष्ट्राच्या* *कानाकोपर्यातून आलेले साहित्यिक व फलटणकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सर्वांची उत्कृष्ट दाद मिळाली.