सांगली, मिरज,कुपवाड महानगरपालिका पदाधिकारी यांची समुद्र इलेक्ट्रॉनिक ला सदिच्छा भेट
महापालिका क्षेत्रातील पथदिवे स्मार्ट एल ई डी ने जोडून स्मार्ट उजेड देण्यासाठी बारामती च्या समुद्र इलेक्ट्रॉनिक सिस्टिम प्रा ली चे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका चे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले.
सांगली शहरातील पुढारी भवन ते कर्मवीर भाऊसाहेब पाटील चौक रस्ता एलईडी ने उजळल्यावर शहरातील उर्वरीत सर्व एल ई डी ची कामे जुलै अखेर होणार आहे महापालिका क्षेत्रातील ४० हजार पथदिवे स्मार्ट एल ई डी दिव्यात रूपांतरित होणार आहे.
हे सर्व काम बारामती एमआयडीसी मधील समुद्र इलेक्ट्रॉनिक सिस्टम प्रा ली कंपनी करीत आहे त्याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या कार्याची व स्मार्ट एलईडी पथदि च्या संदर्भात पाहणी करण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी सहकारी नगरसेवक व विद्युत अभियंता यांनी कामाची पाहणी करण्यासाठी भेट दिली
या वेळी त्यांना समुद्र इलेक्ट्रॉनिक च्या कार्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल थोते यांनी दिली.
या पूर्वी दोन पथ दिव्या मध्ये काही भागात अंधार (कमी प्रकाश) दिसायचा मात्र स्मार्ट एलईडी
दिव्यामुळे दोन पोल मधील भागात संपूर्ण व प्रखर उजेड दिसत आहे अधिक प्रकाश मिळत असून विजेची बचत होत आहे हे खास वैशिष्ट्य समुद्र एल ई डी चे असल्याचे प्रफुल थोते यांनी सांगितले
समुद्र इलेक्ट्रॉनिक चे व्यवस्थापक एम पी ढगे यांनी आभार मानले