बारामती: प्रतिनिधी
ग्राहकांचा वेळ पैसा वाचत असताना सर्व प्रकारचे सर्व नामांकित कंपन्यांचे कपडे मिळत असताना गुणवत्ता व दर्जा राखल्याने ग्राहकाच्या विश्वासास ‘लाडाई ‘ पात्र ठरेल असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
जैनकवाडी येथे लाडाई होलसेल कापड डेपो च्या उदघाटन प्रसंगी दत्तात्रय भरणे बोलत होते या प्रसंगीं पुणे जिल्हा राष्ट्रवादी चे अध्यक्ष प्रदीप गारटकर,राष्ट्रीय कीर्तनकार राधाताई सानप,राष्ट्रवादी कामगार सेल प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, व सचिन सपकळ, शुभम नींबाळकर,प्रताप पाटील,नंदू पानसरे,आदी मान्यवर व बारामती इंदापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्तीत होते.
पानसरे कुटूंबियांनी शेती बरोबरच बांधकाम व्यवसाय,सियाराम शो रूम यशस्वी पणे सांभाळले आहेत आता नवीन व्यवसायात पदार्पण करताना बारामती व इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहक वर्ग डोळ्यासमोर ठेऊन व्यवसाय सुरू केला आहे त्यांच्या व्यवसायास यश नक्की येईल असेही दत्तात्र्य भरणे यांनी सांगितले.
या वेळी प्रदीप गारटकर, राधाताई सानप यांनीही मनोगत व्यक्त केले.
बालकापासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्व वयोगटातील महिला व पुरुषाचे कपडे लग्न बस्ताची खास सोय व मोठ्या शहराती मधील दरा मधेच या ठिकाणी दर असणार आहेत त्यामुळे ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार असून ग्राहकाचे समाधान हेच आमचे ध्येय असल्याचे प्रास्ताविक मध्ये डॉ गणेश पानसरे यांनी सांगितले
उपस्तितांचे स्वागत शिवाजीराव पानसरे व तानाजीराव पानसरे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.