फलटण दि. १४ : सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये नावलौकिक मिळवलेली श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या चेअरमन पदी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी सौ. योगिनी पोकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.
काही दिवसांपूर्वीच श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेची निवडणूक ही बिनविरोध संपन्न झालेली होती. त्यानंतर आयोजित केलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमनपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी सौ. योगिनी पोकळे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. चेअरमन व व्हाईस चेअरमन प्रस्तावाचे सूचक मोहनराव नाईक निंबाळकर हे होते. तर त्यास अनुमोदन प्रभाकर पवार यांनी दिले. त्यानंतर बिनविरोध रित्या सदरील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी फलटणचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले.
श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या चेअरमनपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तर व्हाईस चेअरमन पदी सौ. योगिनी पोकळे यांची निवड झाल्याबद्दल श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेतील अधिकारी, कर्मचारी व सभासदांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व सौ. योगिनी पोकळे यांचे अभिनंदन केले.