महिलांनो व्यक्त व्हा: पूनम कांबळे

कटफळ येथे महिला सदस्यांच्या वतीने  महिला स्नेह मेळावा संपन्न 

विजेत्या महिला सोबत सरपंच पूनम कांबळे व ग्रामपच्यात सदस्या
बारामती:
विविध क्षेत्रात काम करताना आपल्या कला गुणांना न्याय देताना ,नौकरी, व्यवसाय करताना किंवा पदाधिकारी म्हणून कार्य करताना आपले विचार,मार्गदर्शन,कल्पना व्यक्त करा असा सल्ला देत महिलांनो व्यक्त व्हा असे प्रतिपादन कटफळ ग्रामपंचायत च्या सरपंच पूनम कांबळे यांनी केले 

कटफळ येथे  मंगळवार दि ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कटफळ ग्रामपच्यात महिला सदस्यांच्या वतीने  महिलांचा स्नेह मेळावा पार पडला. या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना कटफळ ग्रामपंचायत च्या सरपंच पूनम कांबळे बोलत होत्या 
यावेळी कटफळ ग्रामपंचायत च्या  महिला  सदस्या सीमा मदने , संध्याराणी झगडे , संध्या मोरे , सविता लोखंडे ,  आणि कृषी सहाय्यक अधिकारी  मीरा राणे , बचत गट समन्वयक शुभांगी सूर्यवंशी उपस्थित होत्या.
पर्यावरण संदेश जोपासण्यासाठी प्रत्येक महिलेस देशी झाडांचे  रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून उखाणे,म्हणी,वाक्प्रचार,संभाषण कला व मुलगी वाचवा लेक वाचवा वर आधारित गीते सादर करून होम मिनिस्टर कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले  प्रथम क्रमांक ललिता मोकाशी व द्वितीय संगीता कांबळे व तृतीय क्रमांक सोनाली कांबळे विजेत्या झाल्या.
मुलींनी व महिलांनी स्त्रीबुण हत्या करू नका,मुलगी शिकवा व आई चे कष्ट आदी विषयावर कविता सादरीकरण केले व कटफळ परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा खास सन्मान करण्यात आला.
होम मिनिस्टर कार्यक्रम चे सादरीकरण अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार सीमा मदने यांनी मानले 
 
–———————————-
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!