ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला कु.स्वरा भागवत चा सत्कार.

 


गोखळी दि २६ : 

शिवजयंतीच्या निमित्ताने दि.१९ फेब्रुवारी रोजी कळसुबाई शिखर कमी वेळात अवघ्या १तास५६ मिनिटांमध्ये कु स्वरा योगेश भागवत ने सर करून पहिला अनोखा विक्रम केला .याबद्दल विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. सागून शाल, बुके, ट्रॅक सूट देऊन  गौरविण्यात आले                                          महाराष्ट्रातील सर्वात  उंच कळसुबाई शिखर सात वर्षाच्या कुमारी स्वरा भागवत चालत जावून कमी वेळात शिखर सर करणारी स्वरा ही सर्वात लहान एकमेव मुलगी ठरली आहे याबद्दल जिल्ह्याभरातून तिचे कौतुक होत आहे. .कु.स्वराने यापूर्वी सायकलिंग एका मिनिटात १०० पुश्पप ,५०प्रकारच्या दोरीच्या उड्या मारत तिच्या या कामगिरीची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे तिच्या या मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, खटकेवस्ती चे सरपंच बापूराव गावडे, माजी सभापती शंकराव मारकड, जयकुमार इंगळे, नामदेव नाळे, योगेश भागवत, लखन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच विविध संस्था च्या वतीने कु स्वरा भागवत चे सत्कार करण्यात आले यामध्ये धर्मवीर संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनामध्ये फलटण कोरेगाव चे आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते कुमारी स्वरा भागवत चा सत्कार करण्यात आला यावेळी सभेला अध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख, साहित्यिक जगन्नाथ शिंदे, प्राध्यापक प्रभाकर पवार, कथाकथनकार रवींद्र कोकरे सर , संयोजक प्रकाश सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.बारामती येथील तिरंगा ॲमिनेशन काॅलेज येथे संस्थापक रणजित शिंदे यांनी शाल श्रीफळ, बुके देऊन गौरविण्यात आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!