गोखळी ( प्रतिनिधी) :
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण नवोदय विद्यालय व . शिक्षण विभाग यांच्या वतीने फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण ( N A.S..)२०२१ परीक्षा आज 12नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडली.या परीक्षेसाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली. N CERT कडून ड्रॉ पद्धतीने शाळांची निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी(NAS)2021 फलटण तालुक्यात पूर्व भागातील गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयचा समावेश होता. इयत्ता १० वी च्या वर्गाचा सहभाग होता . ५० पैकी ३० मुलाची निवड झाली होती . मुलांनी उत्साहाने परीक्षा दिली .परीक्षेसाठी कौटुंबिक पार्श्वभूमी, घरी मिळणाऱ्या सुविधा, पालकांचा सहभाग, शाळा मधील सुविधा व सुरक्षितता,कोविड१९ दरम्यान अध्ययन अध्यापन आदी प्रश्न विचारण्यात आले होते. केंद्र संचालक प्रमुख म्हणून राजेंद्र कुमार जाधव सर यांनी काम पाहिले. निरीक्षक म्हणून निलांगी पवार मॅडम यांनी काम पाहिले.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्राचार्य श्री हरिभाऊ अभंग शेडगे सर ननावरे सर धायगुडे मॅडम भोसले मॅडम पवार सर घोरपडे सर यांनी परिश्रम घेतले.