फलटण दि. १४ :
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण व लायन्स क्लब फलटण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स मुधोजी चॕरिटेबल आय हाॅस्पिटल, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.१२ आॅक्टोबर २०२१ रोजी अभियांत्रिकी महाविद्यालय , फलटण येथे मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा), सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या वाढदिवसानिमित्त
मोफत नेञ चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदरच्या शिबिराचे उद्घाटन मा.एमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन्स इंटरनॅशनलचे द्वितीय उपप्रांतपाल, प्रांत ३२३४ ड१,यांच्या शुभहस्ते तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे ग.कौ.सदस्य मा.श्री . शिरीष दोशी ,फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा.श्री .अरविंद निकम,झोन चेअरमन व लायन मुधोजी चॅरिटेबल आय हाॅस्पिटलचे चेअरमन, लायन अर्जूनराव घाडगे , लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष, लायन प्रसन्न कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य, श्री .मिलिंद नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या शिबिरामधे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी इत्यादी 97 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. तपासणी मा.डाॅ.प्रमोदकुमार जमादार यांनी केली, त्यांना श्री.प्रज्वल शेलार, श्री .गुरुनाथ पाटणकर व श्री .गणेश जाधव यांनी सहाय्य केले.
सौ.धनश्री भोईटे, स्थापत्य विभाग प्रमुख यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली. स्वागत व आभार प्रदर्शन प्राचार्य श्री. मिलिंद नातू यांनी केले.