योगीराज उद्योग समूहाने तयार केलेले स्वयंचलित बँको
बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
बारामती एमआयडीसी मधील योगीराज इंडस्ट्रीजच्या वतीने शेती व उद्योग व्यवसाय साठी स्वयंचलित बँको ची यशस्वी पणे निर्मिती केली आहे.
योगीराज इंडस्ट्रीजच्या शेती व शेतीशी निगडित उद्योगांसाठी उपयोगी नावीन्यपूर्ण माध्यमातून शेती व इतर यंत्रांच्या निर्मितीसाठी योगीराज इंडस्ट्रीजने स्वतःचा वेगळा शेतीशी निगडित उद्योग उभा करून नवनवीन यंत्र सामग्री च्या माध्यमातून वेगळा
ठसा उमटविला आहे. त्यांच्या शेती च्या विविध नाविन्यपूर्ण यंत्राला भारता बरोबरच विविध देशात मागणी आहे.
शेतकरी व इतर ग्राहक यांच्या मागणीनुसार ट्रॅक्टरचा बँको निर्मिती केली आहे शेती तसेच इतर उद्योगा साठी त्यांच्या मागणी व अपेक्षे प्रमाणे तयार केली आहे शेती शिवाय बांधकाम,कोळसा ,खाणी, आदी उद्योगांसाठी देखील याचा उपयोग सहज व सोफ्या पद्धतीने करता येतो
शेतकऱ्यांसह बॅकोचा उपयोग अरुंद व कमी जागेत फळबागांचे खड़े, पाइपलाइन चारी,खते टाकणे,दोन पिकांच्या मधून ने आन करणे आदी साठी उपयोग होतो.
चौकट:
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त औजारे कामे करण्यासाठी तसेच ,मुरूम वाळू,खत, माती, व इतर शेती कामासाठी साठी याचा उपयोग होतो एका लिटरमध्ये एक तास चालणारा व सर्व सामान्य व्यक्तीस अनुसरून याची उंची ठेवली आहे यंत्राची उंची साडे सात फूट असून याची क्षमता छोट्या व अडचणीच्या जागेतही काम करण्यासाठी उपयुक्त आहे सर्वात लहान स्वयंचलित असल्याने वाहतूक सुद्धा सहज करता येते.
अशी माहिती योगीराज उद्योग समूहाचे संचालक अरुण म्हसवडे यांनी दिली