कार्यक्रम प्रसंगी भागवत व्ही व्ही यांचा सत्कार करताना प्राचार्य दासरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
म्हसवड दि 01( म्हसवड प्रतिनिधी) :
काही कारणास्तव शिक्षण मधेच बंद करावे लागले असेल किंवा ज्यांना आपली शैक्षणिक पात्रता वाढवायची आहे अश्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठ हे वरदान ठरत असल्याचे मत मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख व प्रशालेचे प्राचार्य प्रवीण दासरे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक* अभ्यासकेंद्र – फलटण एज्युकेशन सोसायटीचे सिध्दनाथ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथे
म्हसवड येथील मुक्त विद्यापिठाचे या शैक्षणिक वर्षात एम ए व एम कॉम अभ्यासक्रम सुरु झाले असून प्रथम प्रवेश घेणाऱ्या प्रवीण भोते यांचा प्रशालेचे प्राचार्य प्रवीण दासरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रशालेच्या उपप्राचर्या आर एल मोकाशी,केंद्रसंयोजक- श्री. म्हेत्रे ए.व्ही.केंद्रसहायक- श्री. सासणे एस. व्ही.तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
काही वेळेस विद्यार्थ्याना परिस्थितीमुळे मधूनच शिक्षण सोडावे लागते,किंवा नोकरीमुळे पुढील शिक्षण घेता येत नाही, तसेच विशेषकरून मुलींचे लग्न झाल्याने मधूनच शिक्षण बंद होते अश्या विद्यार्थ्याणसाठी शिक्षण घेण्यासाठी मुक्त विद्यापीठ हे वरदान ठरत आहे.अश्या सर्वानी म्हसवड येथील मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्याचे आवाहन केंद्रप्रमुख दासरे यांनी केले.
यावेळी केंद्रसंयोजक- श्री. म्हेत्रे ए.व्ही. यांनी केंद्राविषयी माहिती देताना नव्याने सुरू झालेल्या एम ए ला मराठी ,इंग्रजी, हिंदी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाचे प्रवेश सुरु करण्यात आले आहेत तसेच एम कॉम या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात आल्याचे सांगितले.प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत असून यासाठी
केंद्रसंयोजक- श्री. म्हेत्रे ए.व्ही. 8275265938
केंद्रसहायक- श्री. सासणे एस. व्ही. 9623656724 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षक प्रतिनिधी ए सी मुल्ला, व्ही व्ही भागवत ,
सी वाय चव्हाण,डी टी ननावरे,सानप व्ही डी, माने डी ए, गेजगे व्ही डी, देशमुख एस एस.नाळे ए आर,गोंजारी डी पी,नलवडे एम के आदी उपस्थित होते.