आयएसएमटी कामगार संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन

आय एस एम टी कंपनी  मध्ये स्मरणीका प्रकाशन करताना मान्यवर 

जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा 
बारामती येथील औद्योगिक क्षेत्रातील सर्वात जुनी असलेल्या व सीमलेस ट्यूब निर्माण करणाऱ्या आयएसएमटी लिमिटेड या कंपनीतील कामगार संघटनेचा पंचविसावा वर्धापन दिन शुक्रवार  दिनांक 17 सप्टेंबर  रोजी साजरा करण्यात आला. या प्रसंगी  “रौप्य महोत्सव 2021” या स्मरणिकेचे प्रकाशन ट्यूब प्रक्रिया अध्यक्ष  किशोर भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी कार्यकारी उपाध्यक्ष  किशोर भापकर, देखभाल विभाग प्रमुख बलराम अग्रवाल ,युनियनचे अध्यक्ष  कल्याण कदम, उपाध्यक्ष बाळासाहेब आटोळे हे उपस्थित होते.
या वेळी   किशोर भारंबे म्हणाले की ,स्टील  उद्योगांमध्ये  मालाच्या मागणी व पुरवठया नुसार उद्योगाच्या आर्थिक परिस्थितीत चढ-उतार येत असतात. आपण सर्वांनी मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्टील उद्योगाला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत, अशी खात्री मला वाटत आहे, असेही ते म्हणाले .नवीन कामगारांसाठी युनियनने  महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले .
 किशोर भापकर यांनी कंपनी स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा दिला तसेच रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने युनियनचे व  कामगार बंधूंचे अभिनंदन केले . संघटनेचे अध्यक्ष श्री कल्याण कदम यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे जनरल सेक्रेटरी गुरुदेव सरोदे यांनी केले . या कार्यक्रमासाठी संघटना प्रतिनिधी व कामगार बंधूंनी विशेष परिश्रम घेतले.

 
——————————
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!