जळोची: फलटण टुड वृत्तसेवा
बारामती येथील रहिवासी डॉ. आरती अभिषेक शहाचा संशोधन लेख युरोपेन जरनलला प्रकाशित करण्यात आला आहे.
डॉ. आरती अभिषेक शाह यांनी “सायक्लोडेक्स्ट्रिन आधारित हाडांच्या पुनर्जन्मयुक्त समावेशन कॉम्प्लेक्स फॉर रेसवेराट्रोल इन पोस्टमेनोपॉझल ऑस्टियोपोरोसिस” नावाचा एक संशोधन लेख युरोपियन जर्नल ऑफ फार्मास्युटिक्स आणि बायोफार्मास्युटिक्स मध्ये प्रकाशित केला.
रेस्वेराट्रोल हे एक रसायन जे मुख्यतः लाल द्राक्षे आणि या द्राक्षे पासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये (वाइन, रस) आढळते. या बाबत संशोधन करून सदर संशोधन केंद्र शासनास सादर करून पुढील माहितीसाठी अमेरिकन विद्यापीठास सादर केले आहे
या बाबत अभ्यास पूर्ण करून लेख युरोपियन जणरलला सादर केल्यावर सदर लेखाची निवड करून प्रकाशित करण्यात आला आहे .जगभरातील 421 लेख पैकी निवडक लेख प्रकाशित झाले आहेत त्यापैकी आरती हीचा लेख प्रकाशित प्रथम झाला आहे
डॉ. आरती हिने सौ लीलावती रिखवलाल शाह, नीरा शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड बॅचलर तसेच मास्टर ऑफ फार्मसी (फार्माकोलॉजी) डिग्री एनएमआयएमएस विद्यापीठ, मुंबई येथून पूर्ण केले. 01 फेब्रुवारी 2020 तिला मणिपाल अकादमी ऑफ हायर एडुकेशन, मणिपाल कर्नाटक मधून तिला पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. ती सध्या शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेकनॉलॉजी मॅनेजमेण्ट, मुम्बई येथे सहायक प्राध्यापक म्हणून काम करते.
तिच्या पीएचडी प्रोजेक्ट साठी डिपार्टमेंट ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांनी तिला वूमन सायंटिस्ट स्कीम अंतर्गत साईन्टिफिक म्हणून विद्या वेतन देण्यात आले होते . या प्रोजेक्टसाठी तिने महिला वैज्ञानिक म्हणून तीन वर्ष काम केले. ति या कार्याचे श्रेय तिचे वडील बारामती एमआयडीसी मधील रेणुका बर्फ कंपनी चे संचालक विजय एम. झांबरे आणि आई रोहिणी विजय झांबरे याना दिले आहे . सदर लेख यिरोपीयन जनरलला प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ आहे