गोखळी : नीरा उजवा कालवा उपविभाग फलटण निंबळक शाखा अंतर्गत असणाऱ्या १८ पाणी वापर संस्थानचे काम कौतुकास्पद असेच आहे असे प्रतिपादन निंबळक शाखा अभियंता एम पी ठणके यांनी केले. निंबळक शाखा अभियंता एमपी ठणके यांची बदली नीरा डावा कालवा बारामती विभागाअंतर्गत शाखा माळेगाव बुद्रुक तालुका बारामती येथे झाली त्याबद्दल फलटण पूर्वभागातील १८ पाणी वापर संस्थांची चेअरमन व सचिव यांच्या वतीने शाखा अभियंता ठणके व त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले शाखा अभियंता डीएस कोकरे यांचा निरोप स्वागत समारंभाचे निंबळक सेक्स नल ऑफिस समोर आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठणके बोलत होते. यावेळी थंड की यांचा श्री गणेश मूर्ती शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच नव्याने रुजू झालेले शाखा अभियंता श्री कोकरे यांचे शाल श्रीफळ बुके देऊन स्वागत करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना श्री ठणके म्हणाले मी माझ्या कारकीर्दीमध्ये शासनाच्या आदेशानुसार नव्याने स्थापन झालेल्या १८ पाणी वापर संस्था शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचे काम केले माझी पाच वर्षाच्या काळात चांगले नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी कसे देता येईल हे पाहिले सर्व संस्थांची चेअरमन व सचिव यांना कधीही फोन करू द्या त्यावेळी ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करत असल्याचे दिसून आले तसेच सन१७-१८सन१८-१९ तसेच ३१/३/२०२०ला. आपल्या विभागात सर्वात जास्त पाणीपट्टी वसूल करण्याचा मान आपल्या निंबळक शाखेस मिळाला हे कार्य १८ पाणी वापर संस्थाने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यामुळे माझी मान उंचावली पाणी वापर संस्थांची चेअरमन सचिव यांच्या सहकार्यामुळेच मी चांगले काम करू शकलो ते पुढे म्हणाले, पुणे पाटबंधारे विभागांमध्ये वसुलीबाबत प्रथम क्रमांक मिळाला याची श्रेय या पाणी वापर संस्थांना जाते. यावेळी निंबळक शाखा अभियंता म्हणून रुजू झालेले यावेळी म्हणाले मी यापूर्वी केलेल्या कामाच्या अनुभवातून या भागातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने चांगले काम करू असे सांगितले. यावेळी हणमंत इवरे, आप्पासाहेब गावडे संजय जगताप नवनाथ पवार कुमार शेडगे (कदम) बाबासाहेब बनकर दादासो कापसे विठ्ठल शिंदे बाबासो गावडे अनिल माळशिकारे संजय गावडे हनुमान पाणी वापर संस्थेचे चेअरमन शिवलाल गावडे सर आप्पासो ठेंगील अभिजीत पिसाळ साठी पाणी वापर संस्थेचे युवराज मिंड चंद्रकांत कदम उपस्थित होते प्रास्ताविक कॅनाल इन्स्पेक्टर जगदाळे यांनी केले तर आभार शिवलाल गावडे सर यांनी मानले