फलटण दि २३ :
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य यांचे वतीने देण्यात आलेला पहिला “वाचनयात्री राज्यस्तरीय पुरस्कार” मिळण्याचा मान
श्री.गणेश तांबे यांना मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदयजी शिंदे साहेब व फलटण तालुक्यातील शिक्षक समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला, यावेळेस राज्याध्यक्ष उदय शिंदे आपल्या मनोगतात म्हटले की, गणेश तांबे हे सामाजिक,राजकीय,शैक्षणिक कृषी क्षेत्रातील अग्रेसर नाव आहे. सर्वच क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. फलटण तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर शिक्षक समिती परिवारातील ते एक सदस्य असल्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. शिक्षकांच्या अडीअडचणीसाठी ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या हातून असेच उत्तरोत्तर चांगले कार्य घडत राहो,व वाचन चळवळ वाढत राहो ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासमवेत प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान संचालक किरण यादव उपस्थित होते, त्यांनीही गणेश तांबे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला फलटण तालुका शिक्षक समितीचे शिक्षक नेते धन्यकुमार तारळकर, तालुकाध्यक्ष भगवंतराव कदम, ज्येष्ठ नेते आनंदगिरी गोसावी, राजेंद्र पवार, संभाजी बिटले, तानाजी सस्ते, प्रसिद्धीप्रमुख निलेश कर्वे, युवा नेतृत्व दत्ता जानकर, तानाजी वाघमोडे,
प्रेमकुमार कांबळे, खंडेराव काळे सर, पंकज कदम इत्यादी उपस्थित होते.