जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
दरवर्षी रक्तदान ही चळवळ करू पाहणारे व
कोरोना सारख्या महामारीत रक्तदान,प्लाझ्मा दान आदी कार्य करणारे अजितदादा युथ फौंडेशन चे रक्तदान शिबीर हे कार्य लहान नसून महान आहे असे प्रतिपादन पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी बारामती येथील कार्यक्रमात केले.
अजित दादा युथ फौंडेशन च्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन निलेश लंके व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रूपालिताई चाकणकर यांच्या हस्ते संपन्न झाला या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड,वनिता बनकर,भाग्यश्री धायगुडे,व प्रताप पागळे,बाबासो चौधर व इतर मान्यवर उपस्तीत होते.
वृषारोपन,रक्तदान शिबिर,वन्यजीवांना टँकर ने पाणी पाणवठ्यात सोडणे, दहीहंडी व कोरोना मध्ये प्लाझ्मा दान आणि मागणीनुसार रक्तदान करणे ही अजितदादा युथ फौंडेशन ची सामाजिक ओळख असल्याची माहिती फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी दिली.
रक्तदान ही चळवळ होणे साठी कार्य करणारे फौंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले.
उपस्तितांचे स्वागत दत्ता माने,राहुल चौधर, अरविंद काळे,सचिन घाडगे आदींनी केले.
या प्रसंगी कोरोना योद्धा पुरस्कार डॉ सदानंद काळे,किशोर मासाळ आदी ना देण्यात आला.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले. सदर शिबीरामध्ये 1133 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
–—————————–