जळोची :फलटण टुडे वृत्तसेवा
: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (22 जुलै 2021) वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादा युथ फौंडेशन च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार 16 जुलै रोजी आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यशा रुपालीताई चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर रक्तदान शिबीराचे उदघाटन होणार आहे.
यावेळी बारामती तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तीत राहणार आहेत.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास खास वाढदिवसानिमित्त भेट वस्तू देण्यात येणार आहे.
16 जुलै रोजी सकाळी 7 वाजल्या पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर पेन्सील चौक येथील रेक्रेशन हॉल येथे संपन्न होणार आहे ज्यांना रक्तदान करावयाचे आहे त्या सर्वांनी वेळेवर उपस्तीत राहावे असे आव्हान अजितदादा युथ फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी केले आहे.