शहरी भागातील कोविड 19 लसीकरण सत्र ऑनलाईन नोंदणीनुसारच घेणार



सातारा दि.11 (जिमाका):   सातारा जिल्ह्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव सुरु आहे. त्याअनुषंगाने जिल्हापातळीवरुन उपाययोजना सुरु केल्या  आहेत. जिल्ह्यात  कोविड 19 लसीकरण दि. 10 जुलै 2021 अखेर पहिला डोस 773768 आणि 208505 एवढ्या लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 982273 एवढया लाभार्थ्यांनी कोविड 19 लसीकरण डोस घेतला आहे.
जिल्ह्यातील संपुर्ण पात्र लाभार्थ्यांना नियोजनबध्द लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावरुन योग्य नियोजन करण्यात येत आहे. त्याचधर्तीवर सातारा,कराड, फलटण व वाई या फक्त शहरी भागातील कोविड 19 लसीकरण सत्र यापुढे 100 टक्के ऑनलाईन नोंदणीनुसारच घेण्यात येणार आहेत. यामध्ये लस उपलब्धतेनुसार दररोज दुपारी  12 वाजता लसीकरण सत्र https://selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
त्यामुळे यापुढे सातारा,कराड, फलटण व वाई या शहरी भागातील लाभार्थींना ऑन द स्पॉट (on the spot) पध्दतीने लसीकरण करण्यात येणार  नाही  याची नोंद घ्यावी.  
या  दि. 13 जुलै 2021 पासून लस उपलब्धतेनुसार सातारा,कराड, फलटण व वाई या शहरी भागातील लाभार्थींनी उपरोक्त  संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करुनच लसीकरण करायचे आहे. सदर तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरण सत्र ऑन द स्पॉट पध्दतीनेच सुरु राहील असे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा. यांनी  कळविले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!