अभाराचे पत्र अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारताना सदाशिव पाटील व इतर
बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी मधील भारत फोर्ज लिमिटेड कंपनी च्या वतीने शनिवार दिनांक 10 जुलै रोजी विद्या प्रतिष्ठाण येथे आयोजित कार्यक्रमात कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांसाठी रुई ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात 100 मॉड्युलर बेड च्या उभारणी साठी आर्थिक मदत देण्यात आली आली यावेळी भारत फोर्ज उदयोग समूह नेहमी सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असतो व देशात ,राज्यात जेव्हा संकटकालीन परिस्थिती असते तेव्हा भारत फोर्ज त्वरित मदतीला धावत असते असे गौरवउद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रसंगी काढले.
या प्रसंगी मदत केल्याबद्दल शासनाचे अभाराचे पत्र अजित पवार यांच्या हस्ते भारत फोर्ज बारामती चे मनुष्यबळ विभाग प्रमुख सदाशिव पाटील व महेश जाधव यांनी स्वीकारले .
या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, बारामती इन्डस्ट्रीयल मनुफॅचरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार,कंपनीचे इतर अधिकारी,विविध उद्योजक इतर मान्यर उपस्तीत होते.
————+————–