शासकीय कार्यालयात शंभर रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती नको: नागरिकांची मागणी

स्टॅम्प पेपर ची मागणी होत नाही: प्रशासन 

बारामती :फलटण टुडे वृत्तसेवा
तहसील,प्रांत,न्यायालय  व इतर शासकीय कार्यालयात विद्यार्थी ,शेतकरी किंवा नागरिक याना  जात प्रमाणपत्र,उत्त्पन्न दाखला,वास्तव्य दाखला,राष्ट्रीय प्रमाणपत्र,आदी साठी  प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते त्या साठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता नसताना व तसा शासकीय आदेश असताना सुद्धा  विविध शासकीय कार्यालयात मुद्दामहून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर तुमचे काम टाइप करून आणा किंवा स्टॅम्प पेपरवर अर्ज करा  अशी सक्ती केली जात आहे
अशी सक्ती करणे कायद्याने गुन्हा असताना अनेक अधिकारी कर्मचारी या कडे दुर्लक्ष करीत आहेत शासन आदेश क्रमांक मुद्रांक 2004/1636 / सी आर 436 दिनांक 1 जुलै 2004 
यानुसार सद्या कोऱ्या पेपरवर विद्यार्थी, शेतकरी किंवा नागरिक विविध दाखले,शपथपत्र आदी कामे लिहून किंवा टाइप करून दिल्यावर त्यांना तो दाखला किंवा इतर कामे करून द्यावीत असा आदेश असताना 
शंभर रुपये स्टॅम्प पेपरचा कशा साठी आग्रह धरला जातो किंवा सक्ती केली जाते या बाबत नागरिक मधून तर्कवितर्क काढले जात आहेत 
2004 पासून सदर नियम अस्तित्वात असताना केवळ याकडे दुर्लक्ष केल्याने   नागरिकांकडून  आज पर्यंत कित्येक कोटी रुपयांचे  स्टॅम्प विनाकारण विकत घेतले गेले आहेत 
त्यामुळे शासकीय कार्यालयात शंभर रुपयांच्या स्टॅम्प ची सक्ती करू नये अन्यथा त्या साठी जवाबदार  अधिकारी यांची तक्रार 2004 च्या आदेशानुसार करण्यात येईल व गुन्हा नोंद करण्यात येणार आहे .
 तरी नागरिकांनी स्टॅम्प पेपर वरील कामासाठी विकत घेऊ नये तर कोऱ्या पेपरवर अर्ज लिहून द्यावेत  अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश जगताप यांनी सांगितली.

चौकट: 
शासकीय कामासाठी कोणत्याही स्टॅम्प पेपर ची मागणी तहसील किंवा प्रांत कार्यालय सुविधा केंद्रात केली जात नसल्याचे बारामती चे  तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले 


चौकट : 
जात , उत्त्पन्न ,वास्तव्य,राष्ट्रीयत्वा चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय कार्यालय व न्यायालये समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे 
उपरोक्त नमूद कामाकरिता मुद्रांक (स्टॅम्प पेपर) विकत घेण्याची आवश्यकता नाही अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक मुबंई यांच्या वतीने सांगण्यात आले आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!