सातारा जिल्ह्यात प्रथमच गोखळीत दिव्यांगाचे लसिकरण

      

गोखळी ( राजेंद्र भागवत ): 

फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे  ना.ओमप्रकाश. उर्फ बच्छुभाऊ कडू यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात प्रथमच समाजातील दुर्लक्षित दिव्यांगाचे लसिकरण, कोरोना टेस्टिंग करण्यात आले या शिबीरामध्ये तालुक्यातील पवारवाडी, आसू, हणमंतवाडी, साठे,तामखडा,खटकेवस्ती, सरडे, फलटण,सासकल,कुरवली खुर्द,कुरवली बु.,दुधेबावी,राजुरी,मठाची वाडी,रेवडी आदी गावातील १८ वर्षापुढील पुरूष, महिला, मुले,मुली या  दिव्यांगना लसिकरण व कोरोना टेस्टिंग करण्यात आले.यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील यांनी लस उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. .यावेळी   सायकलिंग प्शुशप दोरीवरील उड्या विविध क्षेत्रातील कामगिरी बद्दल कु स्वरा योगेश भागवत  या सहा वर्षीय चिमुकलिचा आणि   ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या सरडे येथील प्रवीण जाधव कुटुंबियांचा ना.बच्छु कडू यांचे स्वीसहाय्यक गौरव जाधव यांचे हस्ते शाल , श्रीफळ,सन्मिनचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या जिवावर उदार होऊन मोफत वैद्यकीय उपचार करणारे गावातील डॉक्टर शिवाजीराव गावडे, डॉ अमोल आटोळे, डॉ नितीन गावडे, डॉ विकास खटके, डॉ सानिया शेख, आरोग्य सेविका लोंढे मॅडम, आशा वर्कस सौ दुर्गा आडके, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना “कोरोना योध्दा”   पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रक्तदान , लसिकरण,कोरोना टेस्टिंग यासाठी बरड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ साळुंखे मॅडम,गोखळी उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ सानिया शेख, आशा वर्कस, फलटण ब्लड बॅंक, फलटणचे वैद्यकीय अधिकारी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ते, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे होते.  यावेळी  जिल्हा परिषद सदस्या सौ उषादेवी गावडे, सरपंच सौ. सुमनताई गावडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास नाळे, गटविकास अधिकारी डॉ अमिता गावडे,खटके वस्तीचे सरपंच बापूराव गावडे, बारामती तालुका भारतीय सेना अध्यक्ष शेखर गाढवे,प्रहार अपंग संघटना जिल्हा अध्यक्ष अमोल कारंडे, मंगेश ढमाळ, महेश जगताप, बापूराव खरात, सुभाष मुळीक, अशोक गोतपागर, मनिषा जगदाळे, दस्तगीर पठाण, युवा उद्योजक प्रणित भिसे, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड,गोखळीचे गावकामगार तलाठी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, अनिरुद्ध बापू गावडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे,खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे मामा, जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गावडे पाटील,सहकार महर्षी डॉ शिवाजी गावडे , उपसरपंच डॉ अमित गावडे, राजेंद्र भागवत , पोलिस पाटील विकास शिंदे, अक्षयकुमार गावडे, योगेश भागवत, मुन्ना शेख,पै.दीपक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी तर ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांनी आभार मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!