विंचुर्णी येथे जनावरांचे लसीकरण व वृक्षारोपण उपक्रम

फलटण : बारामती कृषी महाविद्यालय येथील चतुर्थ वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेली कु.नेहा जालिंदर शिंदे हिने विंचुर्णी येथे कृषी सप्ताह व ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) निमित्त लायन्स क्लब अध्यक्षा सौ.उज्वला रणजीत निंबाळकर व श्री.रणजित रामचंद्र निंबाळकर यांच्या सहकार्याने पशुप्रांत डॉ.श्रीकांत किसनराव मोहिते यांच्यातर्फे जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ.मोहिते यांनी जनावरांचे रोग व प्रतिबंधक उपाय योजना याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विंचुर्णी परिसरात पळस, लिली, केवढा व आपटा या जंगली रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच पिकांवर बोर्डो मिश्रण वापरून रोग नियंत्रण करण्यासाठी मिश्रण तयार करण्याची माहिती व वृक्षांचे लागवडीचे महत्त्व कु.नेहा शिंदे हिने दिले.यावेळी श्री कुंडलिक बागळकर, श्री नवनाथ अहिवळे, श्री महादेव मदने, तेजस्विनी गांधी, सौशीला घाडगे, स्नेहा रिटे, सौ देशमुख निलम,सौ सुनिता कदम ग्रामसेवक श्री भोसले व इतर शेतकरी उपस्थित होते.  कोरोना नियमांचे सर्व पालन करून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!