फलटण :- बुलढाणा विधानसभेचे शिवसेना आमदार संजय गायकवाड खामगाव दौऱ्यावर असता तेथील झालेल्या दलित अत्याचाराच्या विरोधामध्ये बोलत असताना दलित समाजाबद्दल द्वेषभावना उत्पन्न होईल अशा प्रकारे वक्तव्य केले आहे, त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांची आमदरकी रद्द करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)च्या फलटण तालुक्याच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे.
आमदार संजय गायकवाड यांची आमदरकी रद्द करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कडून निवेदन
फलटण :- निवेदन देताना संजय गायकवाड, विजय येवले, संजय निकाळजे, मधुकर काकडे, राजू मारुडा मुन्ना शेख, लक्ष्मण अहिवळे, सतीश अहिवळे, तेजस काकडे
सदर निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे वक्तव्य करणे अशोभानीय आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या वरती दोन समाजाच्या भावना भडकवणे तसेच दलित समाज विरोधी वक्तव्य करणे या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आर. पी. आय. पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गट फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, जिल्हा सचिव विजय येवले, तालुका अध्यक्ष संजय निकाळजे,पश्चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा,जिल्हा सरचिटणीस मुन्ना शेख,फलटण शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, तालुका उपाध्यक्ष सतीश अहिवळे, फलटण शहराध्यक्ष तेजस काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.