लॉकडाऊन मुळे बंद असलेला जलतरण तलाव
बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
कोरोना व लॉकडाऊन या समीकरण मुळे राज्यातील सर्वच जलतरण तलाव चालविणाऱ्या संस्थांना आर्थिक फटका तर बसलाच आहे परंतु या पुढे तलाव चालविणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे.आशा कठीण परिस्थितीत शासनाने जलतरण संस्था ना आर्थिक मदत करावी व जलतरण खेळाडू यांना देशातील व विदेशातील स्पर्धा च्या सराव साठी परवानगी देऊन सहकार्य करावे अशी मागणी संस्था व खेळाडू यांच्या कडून होत आहे.
गेल्या दीड वर्षी पासून जलतरण तलाव बंद आहेत विद्यार्थी, सामान्य नागरिक व घुडघे पाठ कंबर दुखी असणारे रुग्ण व खेळाडू आदी नियमित पोहण्यास व व्यायाम म्हणून जलतरण तलाव कडे येत असतात परंतु तलाव बंद असल्याने त्यांचे शारीरिक नुकसान तर संस्था चे आर्थिक नुकसान व खेळाडू चे सरावा चे अतोनात नुकसान होत
आहे म्हणून
शासनाने जलतरण तलाव मध्ये एका तासात फक्त 5 पोहणारे,सोशल डिस्टन्स चे पालन करून व ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांना पोहण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जलतरण तलाव संस्था व खेळाडू करीत आहेत.
या मुळे संस्था सुद्धा चालू राहील,उत्त्पन्न सुरू होईल व खेळाडू नागरिक याना सुद्धा फायदा होईल.
जलतरण क्षेत्रात पोहने शिकणे यासाठी उन्हाळी सुट्या मध्ये विद्यार्थ्यां साठी अनुकूल असते परंतु लॉक डाऊन मुळे सलग दोन वर्षे अनेक विद्यार्थी पोहने पासून वंचित राहिले व मोबाइल मध्ये दंग झाले हे शारीरिक व मानसिक दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया बारामती क्लब स्वीमर्स क्लब च्या वतीने देण्यात आली
चौकट
गेल्या दीड वर्षा पासून जलतरण तलाव बंद असल्याने उत्त्पन्न पूर्ण पणे बंद असले
तरी रोज स्वछता (मेन्टेन्स) करावी लागते त्यामुळे वीज,पाणी बिल येते व
अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे पगार
सद्या उत्पन्न नसले तरी द्यावेच लागते
त्यामुळे जलतरण तलाव चालविणे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण होऊन बसले आहे अशी माहिती वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या वतीने देण्यात आली
चौकट :
महाराष्ट्रात जरी पोहण्यास बंदी असली तरी काही राज्यात व परदेशात विविध ठिकाणी स्पर्धा चालू आहेत त्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे अशा स्पर्धकांना तरी तलावात सराव करण्यास फक्त 1 तास परवानगी खास बाब म्हणून शासनाने तात्काळ द्यावी अशी मागणी आर्यमॅन सतीश ननवरे व जलतरण प्रशिक्षक सुभाष बर्गे यांनी केली आहे.