कोविड पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगा सर्वोत्तम.
फलटण दि.20 :
जागतिक पातळीवर २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणुनअनेक देशांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय , फलटण यांच्या वतीने २१ जून २०२१ रोजी महाविद्यालया मधे आंतरराष्ट्रीय योगा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे ,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली आहे.
आज बहुतेक घरात मोबाईल, टी. व्ही. मुळे मुलांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. बदललेल्या तंत्रज्ञानाचा अतिरिक्त वापर केल्याने संगणक,मोबाइल या सर्वांमध्ये माणूस स्वतः ला विसरुन गेला आहे. मैदानी खेळ सुद्धा मोबाइल, संगणकावरच खेळले जात आहेत. त्यामुळे आजघडीला समाजातील पिढी शारीरिक , मानसिक विकलांग तयार होत आहे ,या पासून स्वतः चे संरक्षण करणेसाठी, शारीरिक मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी योगा हा एक सर्वोत्तम उपाय आहे .
सध्याच्या कोरोणा महामारीविरुद्ध लढताना योगाची आपल्याला मदत होत आहे. प्राणायामामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व श्वसनाचे विकार दूर होतात. सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला. यावर्षी ही मागच्या वर्षी प्रमाणेच योगा दिन कार्यक्रम महाविद्यालयात व्हर्च्युअल पद्धतीने होत आहेत.
हा दिवस आपल्याला विश्वबंधुत्वाची शिकवण देतो, योगामुळे मानसिक शांती मिळते व आचार-विचारात सकारात्मकता येते. आपण आरोग्य व अपेक्षांची तार जुळविली, तर समग्र मानवी समाज आरोग्यसंपन्न व आनंदी होण्याचा दिवस फार दूर नाही. योगामुळे हे नक्कीच घडू शकते.सध्याच्या संकटात जगाला योगाची निकड अधिक गांभीर्याने होत आहे. रोगप्रतिकारशक्ती बळकट असेल, तर आपण रोगांवर मात करू शकतो. योगासनांमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्याखेरीज शरीर बळकट होऊन चयापचय क्रियाही सुधारते. ‘कोविड-१९’ चा आजार मुख्यत: श्वसनयंत्रणेवर आघात करीत असल्याने अशा वेळी आपल्याला प्राणायामाचा खूप उपयोग होऊ शकतो. योगामुळे ऐक्यभावना वाढीस लागते व मानवतेचे बंध मजबूत होतात. योग कोणताही भेदभाव करीत नाही. कोणीही योग आत्मसात करू शकतो. त्यासाठी लागतो फक्त थोडा वेळ व थोडी मोकळी जागा.संकटाच्या काळातही मन स्थिर ठेवून संकटास धैर्याने सामोरे जाण्याचे मनोबल योगामुळे आपल्याला प्राप्त होते. मन निग्रही पण संयमी बनते असे प्रतिपादन संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे यांनी केले.
सदरच्या आंतरराष्ट्रीय योगा कार्यक्रमात योगाचे प्रात्यक्षिक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. टि. एम. शेंडगे हे करणार आहेत. तरी सदरच्या उपक्रमात सर्व विद्यार्थी ,पालक , शिक्षक , नागरिक यांनी मोठ्या संख्येने ऑनलाइन पद्धतीने सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री . मिलिंद अ.नातू यांनी केले आहे.