पारधी समाजातील मुलाना राज्य शासनाने मोफत शिक्षण द्यावे…रघुनाथ ढोक

 
पूणे (फलटण टुडे वृत्तसेवा ): उरुळी कांचन-महाराष्ट्र शासनाने आदिवासी ,पारथी समाजातील मुलांना गावोगावी   प्रत्येक हायस्कूल मध्ये पदवीपर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण मिळावे ते आज
उरुळी कांचन-यैथे आदिवासी समाजसेवक व लेखक नामदेव भोसले यांचे उरुळी कांचन निवास्थानी रघुनाथ ढोक बोलत होते.त्यांनी
 अचानक 16 जून 2021 रोजी सायंकाळी लेखक सत्यशोधक रघुनाथ ढोक हे भेटी दरम्यान मुलांना मार्गदर्शन करताना बोलले की.पारधी समाजाच्या अडचणी समजून घेऊन पारधी मुलानी चं।गले शिक्षण घेत समाजाला या दलदलीच्या चौकटीच्या बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी फुले एज्युकेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नक्की मदत करणार आहे.
 यावेळी समता परिषदेच्या संध्या आगरकर, कॅनडा स्थाईक श्रीमती शेंडे उपस्थित होते.
यावेळी ढोक यांनी ,जुनी माहिती सांगताना बोलले की सकाळ चे संपादक उत्तम कांबळे यांनी पारधी समाजाच्या व्यथा मांडल्या त्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आवर्जून वाचले होते आणि आज प्रत्यक्ष  त्याच घरात जाऊन त्या कुटुंबात मिसळून समाजाच्या वास्तव अडचणी ,चालीरीती ,अंधश्रद्धा कर्मकांड मध्ये समाज अजूनही गुरपटेलला आहे याचे अनेक अनुभब ऐकले.तसेच लोकांच्या नजरा या समाजाकडे चोरच म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन आज पण बदलण्यासाठी, त्यांच्या योग्य न्याय हक्काच्या भाकरीसाठी आणि शिक्षण देण्यासाठी सुशिक्षित लोकांनी गावोगावी या पारधी समाजाला मदत केली पाहिजे तरच यांचा समाज मुख्य प्रवाहात येईल यासाठी गावोगावी जाऊन या पारधी समाजाला मदत न्याय हक्क मिळवून कसे देता येईल यासाठी व जनप्रबोधन करण्यासाठी आमची संस्था नामदेव भोसले यांच्या कायम पाठीशी राहील असे आस्वासन देऊन पुढे ढोक असेही म्हणाले की *पारधी समाजातील मुलांना गावोगावी  कोणत्याही हायस्कूल मध्ये पदवीपर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण मिळावे अशी शासनाने व्यवस्था करावी.तसेच कोव्हिडं काळात ज्या शिक्षकानी घरोघरी जाऊन शिकविले त्याना अतिरिक्त मानधन ध्यावे.*
यावेळी नामदेव भोसले म्हणाले की आमचा समाज पोटासाठी एखादेच्या रानातून थोडा भाजीपाला आणला तरी चोर गुन्हेगार म्हणून मारझोड करीत तर गावात जाऊन भीक  , खायला शिळे अन्न मागायला गेलो  तर गावची कुत्रे देखील आम्हाला येऊन देत नसत का तर त्यांना मिळणारे अन्न आम्ही हिसकावून नेतो की काय? अशी परिस्थिती आज देखील  आमचा समाज दुःख भोगतोय मग आम्हाला शिक्षण कधी मिळणार.यासाठी  लागणारे कागदपत्रे रेशन कार्ड, जातीचे व इतर दाखले जाचक अटी न लावता सहज कशी मिळेल याची योग्य व्यवस्था केली तर फार उपकार होतील अशी याचना भोसले यांनी शासनाकडे केली.
संध्या आगरकर म्हणाले की विधवा ,घटस्फोटीत महिलांचे पुनर्विवाह होणेसाठी जनजागृती होणे गरजेचे असून पारधी मुलीशी अंतरजातीय  जे लग्न करतील त्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी तसेच  पोलीस प्रशासन व इतरांनी पारधी ,आदिवासी समाजाकडे माणुसकीच्या नजरेने पाहून मदत करावी असे देखील म्हटले.
यावेळी ढोक ,आगरकर,शेंडे यांचे  नामदेव भोसले यांनी पारधी जीवन कहाणी वरील *मराशी कादंबरी* भेट देऊन स्वागत केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!