सातारा दि.18 (जिमाका): दि. 1 जानेवारी 2021 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार मतदार यादी शुध्द करण्याच्या दृष्टीने निर्देश दिलेले आहेत. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी आपल्या भागातील घरांना प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत. त्याद्वारे त्या कुटुंबातील दुबार, मयत, स्थलांतरीत मतदारांची नावे कमी करणे, कृष्णधवल छायाचित्राऐवजी रंगीत फोटो घेणे, मतदार याद्यांचे शुध्दीकरण करणे, यामध्ये नाव, लिंग, वय, पत्ता, रंगीत फोटो याची माहिती घेऊन दुरुस्ती करणे मतदारांची नोंदणी व त्या अनुषंगाने सर्व कामकाज केलेले आहे. परंतु सदर मोहिमेंतर्गत मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो प्राप्त न झाल्याने सदर मतदार स्थलांतरीत झाल्यास अगर कसे याची माहिती मिळत नसल्याने फोटो नसलेल्या मतदारांबाबत बीएलओ यांनी घरोघरी जावून पडताळणी केलेली आहे व त्यानुसार पंचनामे केलेले आहेत.
मतदार यादीच्या छायाचित्र पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान दि. 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव आहे परंतु फोटो नाही असे 262- सातारा मतदारसंघातील सातारा तालुक्यामध्ये 12 हजार 354 मतदार आहे. मा. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे फोटो संकलित करण्याचे काम सुरु आहे. वारंवार प्रेसनोट राजकीय पक्षांना पत्र एनआयसीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करुनही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे फोटो जमा होत नाहीत. सदर मतदार हे त्या यादी भागात राहत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फोटो संकलित करणे शक्य होत नाही. अशा सर्व मतदार यांनी स्वत:चे फोटो नमुना 8 भरुन आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसिल कार्यालय, सातारा निवडणूक शाखा यांच्याकडे जमा करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. परंतु अद्यापही फोटो जमा झालेले नसल्याने सदर मतदार यादी भागात राहत नसल्याचे दिसून आल्याने त्यांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार मतदार नोंदणी अधिनियमाच्या नियम 1960 मधील नियम 13(2) नुसार विधानसभा मतदार यादीत नाव असलेला कोणताही मतदार त्या संबंधित विधानसभा मतदार यादीतील नाव नोंदणीस नमुना 7 भरुन आक्षेप नोंदवू शकतो त्यामुळे तहसिल कार्यालय, सातारा येथे फोटो नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचे काम सुरु आहे. याबाबत कोणाचाही काही आक्षेप असल्यास दोन दिवसात कळविण्यात यावे. त्याबाबत केलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. 262 सातारा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सातारा यांनी सूचित केले आहे. 262-सातारा विधानसभा मतदार संघांतर्गत सातारा तालुक्यातील समाविष्ट असणाऱ्या फोटो नसलेल्या मतदारांची यादी Satara.gov.in/en/notice_