फलटण दि.१६ : केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी यांनी फलटण तालुक्यातील २ रस्त्यांच्या कामासाठी ९ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
फलटण – कुरवली – मांडवखडक – दालवडी – उपळवे – वेळोशी – कुळकजाई या राज्य महामार्ग क्रमांक ६७ पैकी सीतामाई घाट रस्त्याच्या कि.मी. २२-४०० ते २२-६०० या ४ कि.मी. रस्त्यासाठी ५ कोटी ९२ लाख ६५ हजार रुपये आणि फलटण – आसू – तावशी या जिल्हा सरहद्द राज्य महामार्ग क्रमांक ७ पैकी २८ कि.मी. अंतरातील कामासाठी ३ कोटी ९४ लाख रुपये असे फलटण तालुक्यातील २ रस्त्यांसाठी एकूण ९ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये मंजूर केल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आ.दिपकराव चव्हाण यांना दोन स्वतंत्र पत्राद्वारे कळविले.